Join us  

OMG! या अभिनेत्याने पसरवली शेजा-याला कोरोना झाल्याची अफवा, मग झाले असे काही...!! 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 11:24 AM

जाणून घ्या काय आहे प्रकरण

ठळक मुद्देस्टाईल, एक्सक्यूज मी, डबल क्रॉस अशा अनेक चित्रपटात झळकलेला साहिल खान सध्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय.

कोरोना व्हायरसमुळे जणू अख्खे जग थांबले आहे. पण अफवांचा बाजार मात्र जोरात सुरु आहे. आता कोरोनाबद्दलच्या एका अफवा पसरवणा-यात एका अभिनेत्याचेही नाव समोर आलेय. होय, या अभिनेत्याने काय करावे, तर आपल्या सोसायटीतील दोन शेजा-यांना कोरोना असल्याची अफवा पसरवली. यामुळे संबंधित सोसायटीत जणू भूकंप आला. सगळीकडे अफरातफरी माजली. अर्थात हे सगळे प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसली आणि या अभिनेत्याने माफी मागितली. हा अभिनेता कोण तर साहिल खान.होय, स्टाईल, एक्सक्यूज मी, डबल क्रॉस अशा अनेक चित्रपटात झळकलेला साहिल खान सध्या फिटनेस ट्रेनर म्हणून काम करतोय.

नुकतीच साहिल खानने सोशल मीडियावर त्याचे दोन शेजारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याची बातमी शेअर केली होती. महाराष्ट्रातील गोरेगावस्थित इंपीरिअल हार्ईट्समधील दोन लोकांना कोराना झाला आहे़, अशी पोस्ट शेअर केली. पण ही पोस्ट शेअर करताना ना त्याने कुठलीही खातरजमा केली होती, ना  त्याच्याकडे असा दावा करण्यासाठी कुठला पुरावा होता. असे असूनही त्याने आपल्या बिल्डिंगमधील दोघांचा व्हिडीओ शेअर केला होता. यात एक 72 वर्षांचा एक वृद्ध होता तर एक 18 वर्षांचा तरूण़ या दोघांनाही कोरोना असल्याचे त्याने म्हटले होते.

त्याच्या या पोस्टनंतर संपूर्ण सोसायटीत खळबळ माजली. या सोसायटीत अनेक सेलिब्रिटी राहत असल्याने सगळेच धास्तावले. पण असे काही नसल्याचे सोसायटीतील लोकांच्या लगेच लक्षात आले. यानंतर सोसायटीने तात्काळ मीटींग बोलवली गेली. साहिल खानलाही या मीटिंगमध्ये बोलवण्यात आले. या बैठकीत सोसायटीतील लोकांनी साहिल खानला चांगलेच फैलावर घैतले. निराधार, खोटी बातमी पसरवल्याबद्दल त्याला तंबी दिली. यानंतर कुठे साहिल खानचे डोके ठिकाणावर आले आणि त्याने संबंधित व्हिडीओ डिलीट करत, सोसायटीतील सर्व लोकांची माफी मागितली.

त्याच्या सोसायटीतील राहणारा अभिनेता व ज्योतिषी रमन हांडाने यासंदर्भात बॉलिवूड लाईफशी संवाद साधला. रमनने सांगितले की, साहिलने शेअर केलेला तो व्हिडीओ बघून आम्हाला प्रचंड मोठा धक्का बसला होता. असा खोटा व्हिडीओ शेअर करून त्याला काय साध्य करायचे होते, हे आम्हाला ठाऊक नाही.

टॅग्स :बॉलिवूडकोरोना वायरस बातम्या