अभिनेता कुणाल खेमूचा आगामी चित्रपट 'गुड्ड की गन'...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:53 IST
अभिनेता कुणाल खेमूचा आगामी चित्रपट 'गुड्ड की गन' चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात कुणाला खेमूसोबत अपर्णा ...
अभिनेता कुणाल खेमूचा आगामी चित्रपट 'गुड्ड की गन'...
अभिनेता कुणाल खेमूचा आगामी चित्रपट 'गुड्ड की गन' चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटात कुणाला खेमूसोबत अपर्णा शर्मा आणि पायल सरकार या दोन नवीन अभिनेत्री आहेत. ३० आॅक्टोबर रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.कुणाल खेमू वॉशिंग पावडर सेल्समन ‘गुड्डू’ ची भूमिका साकारत आहे. बिहारमध्ये भोली नावाच्या मुलीला सोडून तो कोलकात्याला सेटल होतो. त्या मुलीचे आजोबा त्याला श्राप देतात. जोपर्यंत गुड्डूला खरे प्रेम मिळणार नाही तोपर्यंत हा श्राप तुटणार नाही अशी साधारणत: चित्रपटाची कथा आहे.शांतनु राय छिब्बर आणि शीर्षक आनंद दिग्दर्शित हा चित्रपट अॅडल्ट कॉमेडी आहे.