Join us

घटस्फोटावर गोविंदाची रिअ‍ॅक्शन आली समोर, म्हणाला - "मी सध्या माझ्या..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 10:54 IST

Govinda's reaction on divorce : गोविंदा आणि सुनिता अहुजा ३७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

बॉलिवूडचा हिरो नंबर वन म्हणजेच अभिनेता गोविंदा (Govinda) सातत्याने चर्चेत येत असतो. मंगळवारी म्हणजेच २५ फेब्रुवारीला गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा (Sunita Ahuja) वेगळे होत असल्याच्या चर्चांना उधाण आले. त्या दोघांनी लग्नाच्या ३७ वर्षांनंतर हा निर्णय घेतला. आता या प्रकरणावर गोविंदाच्या कुटुंबाने प्रतिक्रिया दिली आहे. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, परिवारच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले की, सुनीता अहुजाने काही महिन्यांपूर्वी वेगळे होत असल्याची नोटीस पाठवली होती, मात्र त्यानंतर काहीच हालचाल झाली नाही. दरम्यान गोविंदाने टाईम्स ऑफ इंडियाच्या प्रश्नाचं उत्तर दिले आहे.

गोविंदा म्हणाला...

गोविंदा फक्त म्हणाला की, 'सध्या फक्त बिझनेसशी संबंधित चर्चा सुरू आहेत... मी आता माझे चित्रपट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे.' मात्र, सुनीता अहुजाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. गोविंदाचा मॅनेजर शशी सिन्हा म्हणाले, ''कुटुंबातील काही सदस्यांनी दिलेल्या वक्तव्यामुळे या जोडप्यामध्ये काही वाद आहेत. यापेक्षा अधिक काही नाही आणि गोविंदा एक चित्रपट सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे ज्यासाठी कलाकार आमच्या कार्यालयात येत आहेत. हे सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.''

गोविंदाचं एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेयर?

झूम टीव्हीच्या वृत्तानुसार गोविंदा आणि सुनीता अहुजा काही दिवसापासून वेगळे राहत होते. आतापर्यंत गोविंदा किंवा सुनीता अहुजा या दोघांनीही घटस्फोटाच्या अफवांवर कोणतेही अधिकृत वक्तव्य दिलेले नाही. बॉलिवूड नाऊच्या म्हणण्यानुसार, गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबतचे अफेअर घटस्फोटाचे कारण बनले आहे. मात्र ही अभिनेत्री कोण आहे याचा खुलासा अद्याप झालेला नाही.

टॅग्स :गोविंदा