कंगना म्हणेत, कामाची ठिकाणी मला प्रोफेशनल राहायला आवडते
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2017 16:55 IST
रंगून चित्रपटातील ज्युलिया भूमिका साकारत असलेली कंगना रणौतला तिची पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ वेगळी ठेवत असल्याचे तिने सांगितले आहे. ...
कंगना म्हणेत, कामाची ठिकाणी मला प्रोफेशनल राहायला आवडते
रंगून चित्रपटातील ज्युलिया भूमिका साकारत असलेली कंगना रणौतला तिची पर्सनल आणि प्रोफेशन लाईफ वेगळी ठेवत असल्याचे तिने सांगितले आहे. नुकतीच कंगना करनच्या 'कॉफी विथ करन'च्या चॅट शोमध्ये येऊन गेली त्यावेळी तिने आपल्या बरोबर झालेल्या काही घटनेनंतर आपण कामाच्या ठिकाणी कोणतेच नातेसंबंध तयार करत नाही. कामाच्या ठिकाणी फक्त काम करायला कंगना आवडत असल्याचे तिने सांगितले आहे. कामाच्या ठिकाणी मी प्रोफेशनल राहाते असे ही ती म्हणाली. चित्रपटाच्या सेटवर शूटिंग दरम्यान एक सहज वातावरण होणे गरजेच असते, पण मला नाही वाटतात याठिकाणी लोकांबरोबर तुम्ही पर्सनल रिलेशन्स तायर करावे. सहकलाकाराबरोबर तुमचे बाँडिंग हव मात्र त्यांच्या बरोबर कोणतेही नातेसंबंध नको असे मत एका मुलाखती दरम्यान कंगनाने व्यक्त केले आहे. कामाच्या ठिकाणी तिला फॉर्मल राहायलाच जास्त आवडत असल्याचे तिने सांगितले आहे. मी माझ्या कामाशी काम ठेवते. मात्र माझे सहकलाकार माझ्याशी येऊन बोलू शकतील इतकी काळजी मी नक्कीच घेते. कंगना रणौत, सैफ अली खान आणि शाहिद कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला रंगून हा चित्रपट येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. लोकांना सेटवर प्रोफेशनल राहण्याची सल्ले देणारी कंगनाने स्वत: अनेकवेळा आपल्या सहकालाकारांबरोबर रिलेश्नशिपमध्ये राहिली आहे. 2009 साली आलेल्या 'राज: द मिस्ट्री कंटीन्यू' चित्रपटातील सहकलाकार अध्ययन सुमनसोबत कंगना रिलेश्नशिपमध्ये होती. त्यानंतर ऋतिक रोशनसोबत सुद्धा कंगनाच नाव जोडले गेले होते. ऋतिक आणि कंगनाचा वाद तर पोलीस स्टेशनमध्ये गेला होता. ऋतिक, कंगनाने एकमेंकावर अनेक आरोप-प्रत्यारोप केले.