Join us  

हे आहे 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'चे कॅबिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 4:31 PM

मनमोहन सिंहच्या बायोपिकमध्ये विनोद मेहता, सीताराम येचुरी, ए. राजा, एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद, मायावती, सुषमा स्वराज, अमर सिंह, कपिल सिब्बल, ज्योती बसु, प्रणव मुखर्जी, नटवर सिंह, पीव्ही नरसिम्हा राव, अजित पिल्लई, शिवराज पाटील, अर्जुन सिंह आणि उमा भारतीसारख्या नेत्यांच्या पात्रांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'च्या प्रमोशनसाठी करण्यात आले फोटोशूट

अभिनेते अनुपम खेर यांचा आगामी चित्रपट 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'मधील एक फोटो वायरल झाला आहे. त्यात एकाच फ्रेममध्ये मनमोहन सरकारचे सर्व मंत्री, त्यांच्या पत्नी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आजादसोतबच अनेक कॅबिनेट मिनिस्टरच्या गेटअपमधील कलाकार दिसत आहेत. हा फोटो अनुपम खेर, निर्माते हंसल मेहता आणि चित्रपटाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर'च्या प्रमोशनसाठी  फोटोशूट करण्यात आले आहे.मनमोहन सिंहच्या बायोपिकमध्ये विनोद मेहता, सीताराम येचुरी, ए. राजा, एपीजे अब्दुल कलाम, लालू प्रसाद, मायावती, सुषमा स्वराज, अमर सिंह, कपिल सिब्बल, ज्योती बसु, प्रणव मुखर्जी, नटवर सिंह, पीव्ही नरसिम्हा राव, अजित पिल्लई, शिवराज पाटील, अर्जुन सिंह आणि उमा भारतीसारख्या नेत्यांच्या पात्रांचा समावेश आहे. या चित्रपटात एकुण १४० कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाचे प्रोडक्शन बोहरा ब्रदर्स करत आहेत. स्क्रिप्ट मयंक तिवारीने लिहिली आहे.'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' : द मेकिंग एंड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह' या संजय बारुच्या पुस्तकावर हा चित्रपट बनवण्यात आला आहे. हे पुस्तक 2014 मध्ये प्रकाशित करण्यात आले होते. या चित्रपटात बारु यांची भूमिका अक्षय खन्नाने साकारली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे यांनी केले आहे. आतापर्यंत त्यांनी डायरेक्टर हंस मेहता यांच्यासोबत क्रिएटिव्ह प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली आहे. सोनिया गांधीची भूमिका जर्मन अभिनेत्री सुजैन बर्नेट आणि राहूलच्या भूमिकेत अर्जुन माथुर दिसत आहेत. अहाना कुमरा ही प्रियांका गांधीच्या भूमिकेत आहेत. तर दिव्या सेठ मनमोहन सिंह यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट २१ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :अनुपम खेर