Join us  

सहा महिन्यानंतर अबराम चाहत्यांसमोर; 'या' कारणामुळे कॅमेरापासून असतो दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2021 2:56 PM

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan आणि गौरी खान Gauri Khan यांची लेक सुहाना Suhana Khan सोशल मीडियावर ...

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान Shah Rukh Khan आणि गौरी खान Gauri Khan यांची लेक सुहाना Suhana Khan सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. सुहाना अनेकदा फोटो, व्हिडीओजच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र, किंग खानचे अबराम Abramआणि आर्यन Aaryan ही दोन मुलं फार कमी वेळा प्रसारमाध्यमांच्या समोर येतात. विशेष म्हणजे शाहरुखचा लाडका लेक अबराम तब्बल ६ महिन्यानंतर प्रसारमाध्यमांच्या समोर आला आहे. त्यामुळे हा चिमुकला अन्य स्टारकिड्सप्रमाणे चाहत्यांसमोर का येत नाही असा प्रश्न कायमच नेटकऱ्यांना पडतो.

चित्रपट दिग्दर्शक, निर्माता करण जोहर आणि शाहरुख खान यांची मैत्री साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे अनेकदा या सेलिब्रिटींचं एकमेकांच्या घरी येणं-जाणं असतं. अलिकडेच गौरी, अबरामला घेऊन करण जोहरच्या घरी गेली होती. त्यावेळी अबराम छायाचित्रकारांच्या नजरेस पडला. विशेष म्हणजे तब्बल सहा महिन्यांनी अबराम चाहत्यांना दिसला.मात्र, यावेळी गौरी अबरामला घेऊन पटकन निघून गेली. त्यामुळे किंग खान त्याच्या मुलांना प्रसारमाध्यमांपासून दूर का ठेवतो असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला. 

'मला तो आवडतो, पण...'; शमिताने दिली राकेशवरच्या प्रेमाची कबुली? 

६ महिन्यांपूर्वी विमानतळावर दिसला होता अबराम

करण जोहरच्या घरी स्पॉट झालेला अबराम ६ महिन्यांपूर्वी मुंबई विमानतळावर दिसला होता. यावेळी तो शाहरुख- गौरीसोबत सुहानाला विमानतळावर सोडण्यासाठी आला होता. 

'मुलींनी कंडोम खरेदी केलं तर गैर काय?'; बोल्ड विधानामुळे प्रनुतन बहल चर्चेत 

या कारणामुळे किंग खानची मुलं प्रसिद्धीझोतापासून दूर

गौरी आणि शाहरुख त्यांच्या तीनही मुलांच्या बाबतीत जास्त प्रोटेक्टिव्ह आहेत. यात शाहरुखचं झुकतं माप अबरामकडे जास्त आहे. "स्टार आम्ही आहोत. आमची मुलं नाही. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी त्यांच्यासोबत एक ठराविक अंतर पाळणं गरजेचं आहे. सध्या ते त्यांचं बालपण जगतायेत तर त्यांना ते जगू द्या. त्यांना इतक्या कमी वयात लाइमलाइटचा भाग करु नका", असं शाहरुखने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

दरम्यान, सुहाना खानचं सोशल मीडिया अकाऊंटदेखील काही महिन्यांपूर्वीच पब्लिक झालं आहे. यापूर्वी तिचं अकाऊंट प्रायव्हेट ठेवण्यात आलं होतं. त्याचप्रमाणे आर्यनदेखील केवळ आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रपरिवारासोबतच स्पॉट होत असतो. 

टॅग्स :अबराम खानशाहरुख खानगौरी खानसेलिब्रिटी