Join us  

अभिषेकच्या बोटातील अंगठी गायब, इंडस्ट्रीत उलटसुलट चर्चांना पुन्हा उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 10:21 AM

बच्चन कुटुंबात नक्की काय बिनसलं?

बॉलिवूडमध्ये कधी कोणाचं नातं तुटेल सांगता येत नाही. अनेक जोड्या कित्येक वर्षांचा संसार मोडून घटस्फोटाचा निर्णय घेत आहेत. मलायका-अरबाज, हृतिक रोशन-सुझैन खान यांचा घटस्फोट त्यापैकीच एक. बॉलिवूडमध्ये आदर्श कपल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक ऐश्वर्याच्या (Abhishek Bachchan-Aishwarya Rai) जोडीबद्दलही सध्या उलटसुलट चर्चा होत आहे. यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे. 

काही दिवसांपूर्वीच बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा 'प्रतिक्षा' हा बंगला लेक श्वेताला दिला. यानंतर अभिषेक ऐश्वर्यामध्ये खटका उडाल्याच्या चर्चांना आणखीच ऊत आला. नुकताच अभिषेक बच्चन एका कार्यक्रमात आला होता. यामध्ये त्याच्या बोटात अंगठीच दिसली नसल्याने आता त्याच्या नात्यात दुरावा तर निर्माण झाला नाही ना, अशी चर्चा सुरू झालीय. 

अभिषेक आणि ऐश्वर्या 2007 मध्ये लग्नबंधनात अडकले. २०११ मध्ये आराध्याचा जन्म झाला. बच्चन कुटुंब इंडस्ट्रीतील एकदम पॉवरफुल कुटुंब म्हणून ओळखलं जातं.मात्र गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबापासून दुरावल्याची कुजबूज सुरू आहे. पॅरिस फॅशन वीकमध्ये श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेलीने डेब्यू केले. तिला चिअर करण्यासाठी श्वेता बच्चन आणि जया बच्चन आल्या होत्या.  तेव्हा ऐश्वर्या रायही फॅशन वीकमध्ये सहभागी झाली होती. मात्र ती श्वेता आणि जया बच्चन यांच्यासोबत दिसली नव्हती, तेव्हाही अनेकांना आश्चर्य वाटलं होतं.

टॅग्स :अभिषेक बच्चनऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडघटस्फोट