Join us  

‘मनमर्जियां’च्या रिलीजआधी सुवर्णमंदिरात पोहोचला अभिषेक बच्चन!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2018 11:18 AM

 अभिषेक बच्चन सुमारे चार वर्षांनंतर बिग स्क्रीनवर पतरणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला अभिषेकचा ‘मनमर्जियां’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. साहजिकच कमबॅक यशस्वी व्हावे,असे अभिषेकची इच्छा आहे. 

 अभिषेक बच्चन सुमारे चार वर्षांनंतर बिग स्क्रीनवर पतरणार आहे. येत्या २१ सप्टेंबरला अभिषेकचा ‘मनमर्जियां’ प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. साहजिकच कमबॅक यशस्वी व्हावे,असे अभिषेकची इच्छा आहे. त्यामुळे आपल्या या कमबॅक चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिषेक कुठलीही कसूर सोडू इच्छित नाही, चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अलीकडे अभिषेकने अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला भेट दिली. गुरुद्वारात प्रार्थना केल्यानंतर अभिषेकने येथे सेवादानही केले.

तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘मनमर्जियां’मध्ये अभिषेकने एका शिख तरूणाची भूमिका साकारली आहे. दुसऱ्या मुलावर प्रेम करणाºया मुलीशी त्याचे अरेंज मॅरेज होते, असे या चित्रपटाचे कथानक आहे.चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय आणि प्रेक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. या चित्रपटात अभिषेकशिवाय तापसी पन्नू आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत आहेत.  ट्रेलर बघता, हा चित्रपटात एक प्रेमत्रिकोण दिसणार, असे दिसतेय. ट्रेलरची सुरूवातचं मजेशीर आहे. तापसी व विकी कौशलच्या किसींग सीनने ट्रेलरची सुरूवात होते. या चित्रपटात तापसीने रूमी नावाच्या एका पंजाबी मुलीची भूमिका साकारली आहे. विक्की तिच्यावर जिवापाड प्रेम करतो. पण लग्न आणि जबाबदाऱ्या त्याला नको असतात. मग यात अभिषेकची एन्ट्री होते. रॉबी नावाच्या पंजाबी मुलाची भूमिका त्याने यात साकारली आहे. रूमीसोबत अरेंज मॅरेज करण्यासाठी रॉबी तयार असतो.

टॅग्स :अभिषेक बच्चन