Join us  

'बंटी और बबली'चा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, अभिषेक बच्चन व राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 11:24 AM

अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री राणी मुखर्जी तब्बल दहा वर्षानंतर 'बंटी और बबली'च्या सीक्वलमध्ये एकत्र काम करताना दिसणार आहेत.

ठळक मुद्देतब्बल दहा वर्षानंतर एकत्र येणार अभिषेक व राणी'बंटी और बबली'चा सिक्वलच्या चित्रीकरणाला लवकरच होणार सुरूवात

अभिनेता अभिषेक बच्चन अनुराग कश्यप दिग्दर्शित 'मनमर्जियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करतो आहे. या सिनेमानंतर अभिषेक अनुराग कश्यपसोबत 'गुलाब जामून' चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटात अभिषेकसोबत ऐश्वर्या राय व अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र आता यशराज फिल्म्सच्या सूत्रांकडून समजते आहे की आदित्य चोप्रा 'बंटी और बबली'च्या सीक्वलची तयारी करतो आहे. त्यामुळे अभिषेक व राणी मुखर्जी एकत्र रुपेरी पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे. 

अभिनेता अभिषेक बच्चन व अभिनेत्री राणी मुखर्जी तब्बल दहा वर्षानंतर एकत्र काम करताना दिसणार आहेत. हे दोघेही या चित्रपटाबाबत खूप उत्सुक असल्याचे समजते आहे. या दोघांनी 'बंटी और बबली'सह 'युवा', 'हम तुम','बस इतना सा ख्वाब है', 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या सिनेमात काम केले आहे. आदित्य चोप्रा 'बंटी और बबली'च्या सिक्वलबाबत खूप उत्सुक आहे. २००५ साली प्रदर्शित झालेला 'बंटी और बबली' चित्रपट क्राईम थ्रिलरवर आधारीत आहे. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या सिनेमातील अमिताभ बच्चन व ऐश्वर्या बच्चन यांचे 'कजरारे...' हे गाणे लोकांना खूप भावले होते. तसेच यातील इतर गाणी रसिकांना आवडली होी. आता म्हणे आदित्य चोप्राला 'बंटी और बबली' सिनेमाच्या सिक्वेलसाठी योग्य स्क्रीप्ट मिळाली असून लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. शाद अली दिग्दर्शन करणार नसल्याचे समजते आहे. मात्र आता सीक्वलचे दिग्दर्शन कोण करणार हे अद्याप समजू शकलेले नाही. 'बंटी और बबली'चा सिक्वल येणार हे ऐकल्यावर अभिषेक बच्चन व राणी मुखर्जीचे चाहते खूप खूश झालेत. 

टॅग्स :अभिषेक बच्चनराणी मुखर्जी