Join us

श्वेता बच्चनच्या स्टोर लॉन्च इव्हेंटमध्ये भाव खावून गेली शाहरूखची लेक सुहाना खान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2018 12:42 IST

अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आहे. यापूर्वी पापा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कमर्शिअल जाहिरात शूटमुळे ती चर्चेत आली होती. सध्या ती तिच्या फॅशन ब्रँडमुळे चर्चेत आहे. 

अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता नंदा बच्चन पुन्हा एकदा चर्चेत आहे. यापूर्वी पापा अमिताभ बच्चन यांच्यासोबत कमर्शिअल जाहिरात शूटमुळे ती चर्चेत आली होती. सध्या ती तिच्या फॅशन ब्रँडमुळे चर्चेत आहे. होय, श्वेता नंदा बच्चनने मुलगी नव्या नवेली नंदा आणि तिची फॅशन डिझाईनर मैत्रिण मोनिशा जयसिंह हिच्यासोबत मिळून मुंबईत एक फॅशन स्टोर लॉन्च केला. बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी काल संध्याकाळी या स्टोरच्या उद्घाटनला पोहोचले.

अख्खी बच्चन फॅमिलीही यावेळी दिसली. अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी श्वेताच्या स्टोर लॉन्चला आवर्जुन हजेरी लावली.

या स्टोर लॉन्चला अनेकजण पोहोचले. पण प्रमुख आकर्षण ठरली ती शाहरूख खान आणि गौरी खानची लाडकी लेक सुहाना खान. सुहाना खान अतिशय ग्लॅमरस लूकमध्ये यावेळी दिसली आणि सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या.

अगदी अलीकडे सुहाना वोग इंडिया या लोकप्रीय मॅगझिनच्या कव्हरपेजवर झळकली होती. लवकरच ती बॉलिवूड डेब्यू करणार, अशी खबर आहे.

तिच्याशिवाय टायगर श्राफसोबत ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मधून डेब्यू करणार असलेली चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे आणि शनाया कपूर या सुद्धा हॉट अवतारात या स्टोर लॉन्चला पोहोचल्या.

नीता अंबानी या सुद्धा मुलगी ईशा अंबानीसोबत यावेळी उपस्थित होत्या.याशिवाय करिश्मा कपूर, करण जोहर, कॅटरिना कैफ, नेहा धूपिया असे अनेकजण यावेळी दिसले.

टॅग्स :सुहाना खान