Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दारू आणि ड्रग्सच्या नशेत हरवली होती ‘एबीसीडी’ची ही अभिनेत्री, केला Shocking खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 08:00 IST

ग्लॅमरच्या जगात वावरताना मानसिक तणाव व व्यसनांना बळी पडणा-या अनेक सेलिब्रिटींच्या कथा आपण वाचल्या. ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणा-या या अभिनेत्रीनेची कहाणीही अशीच.

ग्लॅमरच्या जगात वावरताना मानसिक तणाव व व्यसनांना बळी पडणा-या अनेक सेलिब्रिटींच्या कथा आपण वाचल्या आहेत. ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री लॉरेन गॉटलिब हिची कहाणीही अशीच. टीव्ही शोमधून आपल्या जबरदस्त डान्सने बॉलिवूडकरांचे आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधणा-या लॉरेनने ‘एबीसीडी’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केला होता. यानंतर लगेच ‘एबीसीडी 2’मध्येही ती झळकली. पण यानंतर अचानक अंधारात गुडूप व्हावी तशी बॉलिवूडमधून गायब झाली. या काळात ती कुठे होती? याचे उत्तर खुद्द लॉरेनने दिले आहे.

एका मुलाखतीत लॉरेनने तिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगितले. ‘सोशल मीडियाद्वारे मी चाहत्यांच्या संपर्कात होते. सोशल मीडियावरच्या फोटोंमध्ये मी आनंदी दिसायची. पण प्रत्यक्षात असे काहीही नव्हते. मी आतून प्रचंड दु:खी होते.  दारू, ड्रग्जच्या नशेत आनंद शोधत होते. सुमारे 8 महिने मी जगापासून दूर होते. जणू मी एका अंधा-या दरीत अडकून पडले होते. इथून बाहेर काढणारे कुणीतरी यावे,असे आतून वाटायचे. कुणी माझा फोटो घेतला तरी माझ्यापासून काहीतरी हिरावून घेतल्या जातेय, असे मला वाटायचे. बेसबॉल कॅप आणि कानात इयरफोन घालून मी तासन् तास रस्त्यांवर भटकत राहायचे. तासन् तास रडायचे. पण कुणी समोर आले की, मी लगेच आनंदी असल्याचा दिखावा करायचे,’असे लॉरेनने सांगितले.

‘एबीसीडी 2’पासून हे सगळे सुरु झाले, असेही तिने सांगितले. ‘एबीसीडी 2’पासून मला जणू दूर फेकले गेले. माझे चांगले सीन्स कापले गेले. त्यानंतरचे सहा महिने माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट   होते. या काळात मी नशेच्या आहारी गेले. पण त्या काळात कुणीही माझी मदत केली नाही, असेही तिने सांगितले.

टॅग्स :लॉरेन गॉटलिब