Join us  

‘भोपा स्वामी’ची एकेकाळी जेवणाची सोय नव्हती, आज आहे कोट्यावधीची संपत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 6:14 PM

Aashram's Bhopa Swami aka Chandan Roy Sanyal : चंदन रॉय सान्यालने ‘आश्रम’या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारली होती. तूर्तास हाच भोपा स्वामी चर्चेत आहे.

दिग्दर्शक प्रकाश झा यांनी दिग्दर्शित केलेली ‘आश्रम’ (Aashram) ही वेबसीरिज आली आणि लोकांनी डोक्यावर घेतली. म्हणायला या सीरिजने काही वाद ओढवून घेतले, पण सीरिज हिट झाली. पाठोपाठ सीरिजचा दुसरा भाग आला आणि आता तिस-या पार्टचं शूटींग सुरू आहे. या सीरिजमधील बाबा निराला पासून बबीतापर्यंत सगळीच पात्र गाजली. बॉबी देओलने (Bobby Deol ) साकारलेला बाबा निराला आणि बाबा निरालाचा व्याप सांभाळणारा भोपा स्वामी (Bhopa Swami ) यांच्या भूमिकांचं प्रचंड कौतुक झालं होतं. तूर्तास हाच भोपा स्वामी चर्चेत आहे. होय, चंदन रॉय सान्याल (Chandan Roy Sanyal ) याने या सीरिजमध्ये भोपा स्वामीची भूमिका साकारली आहे.

आज चंदन रॉय सान्याल या नावाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. इथपर्यंत पोहोचण्यासाठी चंदनने बराच मोठा संघर्ष केला.

राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘रंग दे बसंती’ या चित्रपटापासून चंदनच्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली होती. तुम्हाला आठवत असेलच, या चित्रपटात त्याने  बटूकेश्वर दत्तची भूमिका साकारली होती.  त्यानंतर  विशाल भारद्वाज यांच्या ‘कमीने’मध्ये तो झळकला होता. पुढे छोट्या छोट्या भूमिका साकारत साकारत त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. आज चंदनकडे पैसा आहे, प्रसिद्धी आहे. पण 20 वर्षांआधी जेवणाचीही भ्रांत होती.

होय, 20 वर्षांपूर्वी चंदन मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे  पैसे नव्हते. उपाशीपोटी त्याने अनेक रात्री काढल्या. आज मात्र त्याच्याकडे कोट्यावधीची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, चंदन आजघडीला 7.30 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे. एका अलिशान घरात तो राहतो. आश्रम या सीरिजनंतर त्याने आपल्या मानधनाच्या रकमेतही वाढ केली आहे. 

टॅग्स :आश्रम चॅप्टर २बॉबी देओलवेबसीरिज