Join us  

गरीब मुलांनी बॉबी देओलला मारली मिठी; अभिनेत्याने केलेलं 'हे' कृत्य पाहून तुम्ही व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2022 2:56 PM

Bobby deol: या व्हिडीओमध्ये बॉबीला पाहिल्यावर काही गरीब मुलं त्याच्या जवळ आली आणि फोटो काढू लागली. मात्र, यावेळी ते बॉबीला बिलगल्यानंतर अभिनेत्याने दिलेले एक्स्प्रेशन्स पाहण्यासारखे होते.

मध्यंतरी बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने (Bobby Deol) कलाविश्वातून फारकत घेतली होती. मात्र, आश्रम या वेबसीरिजमधून त्याने दमदार कमबॅक केलं. त्यामुळे गेल्या कित्येक काळापासून तो या सीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजमुळे बॉबीने पुन्हा एकदा त्याचा नवा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तो सातत्याने चर्चेत येत आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचे एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बॉबीला पाहिल्यावर काही गरीब मुलं त्याच्या जवळ आली आणि फोटो काढू लागली. मात्र, यावेळी ते बॉबीला बिलगल्यानंतर अभिनेत्याने दिलेले एक्स्प्रेशन्स वाखाणण्याजोगे होते.

सध्या सोशल मीडियावर बॉबी देओलचा एक व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो भाऊ अभय देओलसह (abhay deol)एका ठिकाणी स्पॉट झाला. यावेळी त्याला पाहताच काही गरीब मुलं त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे सरसावले. इतकंच नाही तर यातील एका लहान मुलीने त्याला मिठी मारली. तिचं पाहून अन्य मुलांनीही बॉबीला मिठी मारली. परंतु, यावेळी बॉबीने दिलेल्या एक्स्प्रेशन्समुळे वा त्याच्या कृतीमुळे अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.

बॉबीला पाहताच या मुलांनी त्याला मिठी मारण्यास सुरुवात केली. मात्र, त्यानेदेखील या सगळ्या मुलांना प्रेमाने जवळ घेत त्यांच्यासोबत फोटो काढला. त्याच्या स्वभावातील हा साधेपणा नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकदा सेलिब्रिटी गरीब मुलं वा व्यक्ती दिसल्यावर त्यांच्यापासून पळ काढतात. मात्र. बॉबीने असं न करता त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे वागणूक दिली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, 'आश्रम'नंतर बाद बॉबी (Bobby Deol) ओटीटीवरील लोकप्रिय अभिनेता ठरला आहे. त्यामुळे चाहते आता 'आश्रम 3' ची प्रचंड वाट पाहात आहेत. अलिकडेच त्याची लव हॉस्टल ही सीरिज प्रदर्शित झाली आहे.

टॅग्स :बॉबी देओलसेलिब्रिटीसिनेमाअभय देओल