Join us  

आराध्याच्या बर्थ डे पार्टीनंतरचा अबरामचा 'हा' व्हिडिओ बघाच

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 12:38 PM

शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आराध्या बच्चनच्या बर्थडे पार्टीनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. आराध्य बच्चनाच्या बर्थडेला अबराम आई गौरीसोबत गेला होता.

ठळक मुद्देया व्हिडिओत अबराम फोटोग्राफर्सना 'नो पिक्चर्स’ असे ओरडून सांगताना दिसतोयऐवढेच नाही तर त्यांना आपला चेहरा लपवताना दिसतोय

शाहरुख खानचा लहान मुलगा अबराम आराध्या बच्चनच्या बर्थडे पार्टीनंतर चांगलाच चर्चेत आला आहे. आराध्य बच्चनाच्या बर्थडेला अबराम गेला होता. तिथून बाहेर निघताना त्यांना प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यांने घेरले मात्र त्याला ते फारसे आवडले नाही. त्याने फोटो काढण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत अबराम फोटोग्राफर्सना 'नो पिक्चर्स’ असे ओरडून सांगताना दिसतोय. ऐवढेच नाही तर त्यांना आपला चेहरा लपवताना दिसतोय. असाच प्रकार याआधी शाहरुनची मोठी मुलगी सुहानाच्या बाबतीत घडला होता. 

आराध्याच्या बर्थ डे पार्टी अबराम आई गौरी खानसोबत आला होतो. यावेळी त्यांने बींग बीना तुम्ही माझे आजोबा आहात तर तुम्ही आमच्यासोबत का नाहीत राहत असा निरागस प्रश्न त्यांने अमिताभ बच्चन यांना विचारला. अमिताभ यांनी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला असून या फोटोमध्ये त्यांच्यासोबत अबराम आणि श्वेता नंदा दिसून येत आहे. ‘शाहरुखचा हा लहानगा अबराम मला त्याचे अजोबा समजतो. मीच शाहरुखचा वडील आहे असा त्याचा समज आहे. त्यामुळे जर मी खरंच शाहरुखचा बाबा असेन तर मी त्यांच्यासोबत त्यांच्या घरी का राहत नाही असा प्रश्न त्याला पडला आहे,’ असं बिग बीने शेअर केलेल्या फोटोमध्ये म्हटलं आहे.आतापर्यंत शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. त्यामुळे अमिताभ -शाहरुख यांच्यात वडील- मुलाचं नातं असल्याचं अबराम समजतो. त्यामुळेच त्याने हा निरागस प्रश्न विचारल्याचं बिग बींनी म्हटलं आहे.

टॅग्स :अबराम खानगौरी खानशाहरुख खान