Join us  

लगीन घाई! आयराच्या लग्नाची जोरदार तयारी, विद्युत रोषणाईने सजले घर; VIDEO व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 2:45 PM

अगदी पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे.

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानची मुलगी आयरा खान लवकरच तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्न करणार आहे. आयरा आणि नुपूर हे महाराष्ट्रीय पद्धतीने विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांच्याही घरी लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आयराच्या लग्नानिमित्त मुंबईतील घर फुलांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आलं आहे. त्यांच्या घराचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

आयरा खान आणि नुपूर शिखरे यांचा नोव्हेंबर २०२२ मध्ये साखरपुडा झाला होता. आता हे जोडपे ३ जानेवरी रोजी लग्नबंधनात अडकणार आहे. अगदी पारंपरिक महाराष्ट्रीय पद्धतीने आयरा व नुपूरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आयराचा होणारा नवरा नुपूर हा महाराष्ट्रीयन आहे.  तर लग्नानंतर ६ ते १० जानेवारी दरम्यान दिल्लीत व जयपूरमध्ये रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. वडील म्हणून आमिरसाठी हा महत्त्वाचा आणि भावनिक क्षण आहे.

रिपोर्टनुसार, आमिर खानची मुलगी आयराहिचे लग्न एक भव्य सोहळा असेल. रिसेप्शनसाठी आमिर स्वतः फिल्म इंडस्ट्रीतील लोकांना आमंत्रित करत आहे. पाहुण्यांच्या यादीत तरुण कलाकारांपासून ते ज्येष्ठ अभिनेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. सलमान खान, जुही चावला, फातिमा सना शेख, सान्या मल्होत्रा, हृतिक रोशन, शाहरुख खान आणि करीना कपूर खान यांच्यासह अनेक स्टार्स आमिरच्या लाडक्या लेकीच्या लग्नाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

आयरा खान आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आयरा आणि नुपूर यांची ओळख एका जिममध्ये झाली होती. जिममध्ये ओळख झाल्यानंतर ते दोघं अनेकदा भेटत होते.  डेटिंगदरम्यानच त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. सोशल मीडिया पोस्टद्वारे हे दोघं अनेकदा आपलं प्रेम, फोटो शेअर करताना दिसतात. आयरा आमिर खान आणि रीना दत्ता यांची मुलगी आहे. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटीबॉलिवूडइरा खान