Join us  

पत्नी अवंतिका ऐवजी 'मिस्ट्री वुमन'सोबत दिसला आमिर खानचा भाचा, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 6:55 PM

इमरान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. यात त्याच्यासोबत असलेल्या मिस्ट्री वुमनची चर्चा होताना दिसते आहे.

जाने तू या जाने ना फेम अभिनेता इमरान खानने आपल्या पहिल्याच चित्रपटातून चांगलीच लोकप्रियता मिळाली होती. मात्र अचानक तो इंडस्ट्रीतून गायब झाला. कित्येक वर्षांपासून तो कोणत्याच चित्रपटात झळकला नाही आणि ना ही कोणता लेटेस्ट फोटो शेअर केला. दरम्यान आता इमरान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे. या व्हिडीओत इमरान त्याची लेक इमारासोबत मुंबईच्या बीचवर एन्जॉय करताना दिसला. मात्र या व्हिडीओत त्याच्यासोबत असलेल्या मिस्ट्री वुमनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

सोशल मीडियावर पहायला मिळत असलेल्या इमरान खानच्या व्हिडीओत त्याच्या मुलीसोबत एक मिस्ट्री वुमनपण दिसते आहे. या व्हिडीओत असलेली महिला त्याची पत्नी अवंतिका नाही आहे. कारण त्या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचे वृत्त सातत्याने ऐकायला मिळते. इमरान खानचा हा व्हिडीओ विरल भयानीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे.

इमरान खानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत इमरान खानला ओळखणंही कठीण झाले आहे. कारण इमरानने चेहऱ्यावर मास्क लावला आहे. सोबत ब्लॅक रंगाचा रेनकोट आणि गमबूट्स परिधान केले आहेत. या व्हिडीओत पहायला मिळत आहे की मुंबई बीचवर फिरल्यानंतर मुलगी इमाराचा हात पकडून रस्त्यावर येताना दिसतो आहे. पापाराझीकडे कानाडोळ करत कारकडे जाताना दिसला.

त्याच्यासोबत असलेली मिस्ट्री वुमन अवंतिका नाही तर कोण आहे असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार, ही मिस्ट्री वुमन त्याची बहिण आहे. जिच्या हातात छत्री पहायला मिळते आहे. 

इमरान खानने जाने तू या जाने ना या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत जेनेलिया डिसुझा दिसली होती. या चित्रपटातील दोघांची जोडी खूप भावली होती. मात्र यानंतर त्याचे रिलीज झालेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाही. शेवटचा तो कट्टी बट्टी चित्रपटात दिसला होता.

टॅग्स :इम्रान खानइमरान खान