Join us  

Jr NTR च्या चित्रपटात Aamir Khan ची एंट्री; KGF च्या डायरेक्टरने दिली मोठी हिंट...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2023 2:18 PM

Jr. NTR च्या 31 व्या चित्रपटात आमिर खान दिसणार आहे. हा चित्रपट KGF फेम प्रशांत नील डायरेक्ट करत आहे.

Aamir Khan South Movie: बॉलीवूड सुपरस्टार आमिर खानचा (Aamir Khan) मागील चित्रपट 'लाल सिंग चड्ढा' बॉक्स ऑफिसवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. यापूर्वी आमिरच्या चित्रपटांनी जशी कामगिरी केली आहे, तशाप्रकारची कामगिरी या चित्रपटाने केली नाही. या चित्रपटाच्या अपयशामुळे आमिरने चित्रपटांमधून काही काळ ब्रेक घेतला आहे. यातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ब्रेकनंतर आमिर साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत (Jr. NTR) एका चित्रपटात काम करताना दिसणार आहे.

आमिरची साऊथ चित्रपटाकडे वाटचाल

आमिर खानला दोन वर्षांत एक चित्रपट करायला आवडतो, तो चित्रपट करण्याबाबत खूप निवडक आहे. कोणताही चित्रपट साईन करताना कलाकार अनेक पैलूंचा विचार करतात. आज दक्षिणेतील उद्योग वाढत आहेत, साऊथचे चित्रपट जगभर कमाई करत आहेत. अशा परिस्थितीत आमिर खानला ज्युनियर एनटीआरच्या चित्रपटात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यावर अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, परंतु वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चाहते आमिर आणि ज्युनियर एनटीआर 2023 मध्ये एकत्र काम करताना पाहू शकतात. KGF चित्रपटाचे दिग्दर्शक प्रशांत नील याची तयारी करत आहेत.

ज्युनियर NTR चा 30 वा चित्रपट

IANS च्या वृत्तानुसार, प्रशांत नील या खास चित्रपटासाठी आमिर खानशी संपर्क साधू शकतो. या चित्रपटाची सर्वात खास गोष्ट म्हणजे ज्युनियर एनटीआरचा हा 31 वा चित्रपट असेल. म्हणूनच त्याचे शीर्षक आता NTR 31 असे ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाबद्दल निर्माते खूप आशावादी दिसत आहेत. आमिर खान हा एक आंतरराष्ट्रीय स्टार आहे आणि अलीकडच्या काळात ज्युनियर एनटीआरचाही दबदबा वाढला आहे. अशा परिस्थितीत दोघांना एकत्र पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नसेल.

टॅग्स :आमिर खानआमिर अलीज्युनिअर एनटीआरबॉलिवूड