Join us  

​ फातिमा सना शेखसोबत ‘हे’ काम करताना दिसणार आमिर खान!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2017 8:11 AM

आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट येत्या वर्षांत बॉक्सआॅफिसला ...

आमिर खान, अमिताभ बच्चन, फातिमा सना शेख आणि कॅटरिना कैफ यांचा ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ हा चित्रपट येत्या वर्षांत बॉक्सआॅफिसला धम्माल करणार आहे. सध्या या चित्रपटाचे शूटींग सुरू आहे. याच चित्रपटाबद्दल एक ताजी बातमी आहे. होय, या चित्रपटात आमिर खान फातिमासोबत एक डान्स नंबर करणार आहे. आमिर व फातिमाने अलीकडेच या डान्स नंबरचे शूट पूर्ण केल्याचे कळते. प्रभुदेवाने हे गाणे कोरिओग्राफ केले आहे. फातिमा ही आमिरची आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळेच ‘दंगल’ नंतर आमिरने तिला आपल्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये कास्ट केले. ‘दंगलमध्ये आमिर व फातिमा या दोघांनी बाप-लेकीची भूमिका साकारली होती. पण आता ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिर व फातिमा दोघेही कथितरित्या एकमेकांशी रोमान्स करताना दिसणार आहेत. अलीकडे फातिमाने यावर अगदी बिनधास्त उत्तरही दिले होते. एका चित्रपटात मी आमिरची मुलगी झाली असले आणि दुस-याच चित्रपटात मला त्याच्यासोबत रोमान्स करायचा असल्यास, मला काहीही आक्षेप नाही. मी एक कलाकार आहे आणि माझ्या वाट्याला ज्या भूमिका येतील, त्या करायला मला आवडेल, असे ती म्हणाली होती.ALSO READ: Trolled: ​फातिमा सना शेखच्या ‘शेमलेस सेल्फी’ने आणला लोकांना राग! वाचा सविस्तर!!विशेष म्हणजे, अमिताभ बच्चन हेही या गाण्याचा भाग आहेत. सूत्रांचे मानाल तर अमिताभ यांनी या गाण्यात अशा काही स्टेप्स दिल्या आहेत की, पाहणारेही दंग होतील. अलीकडे अमिताभ यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली आहे. या वयातही अमिताभ अशा काही स्टेप्स देत असलेले पाहून खुद्द प्रभु देवाही चाट पडला. काही दिवसांपूर्वी खुद्द अमिताभ यांनी आपल्या सोशल अकाऊंटवरून या गाण्याबद्दल माहिती दिली होती. या गाण्याशिवाय या चित्रपटात आमिर व अमिताभ यांच्यात एक फाईट सीनही असणार आहे. मुंबईत या सीनचे शूटींग होणार आहे. सध्या अमिताभ व आमिर दोघेही या सीनसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे.