Join us  

'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंग दरम्यान चक्क आमिर खानला घ्याव्या लागल्या पेनकिलर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2020 12:36 PM

आमिरने चक्क पेनकिलर्स घेतल्या पण शूटिंग थांबू दिले नाही.

आमिर खान सध्या त्याचा महत्वाकांक्षी सिनेमा 'लाल सिंग चड्ढा'च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमासाठी आमिर खानला कोणतीच कसर सोडायची नाही आहे. लाल सिंग चड्ढासाठी आमिर खानने 20 किलो वजन वाढवले आहे. आता उरलेले शूटिंग कमी करण्यासाठी वाढवलेले वजन कमी करतोय. ऐवढेच नाही तर 'लाल सिंग चड्ढा'तील स्पेशल सीक्वेंस शूट करण्यासाठी आमिरने चक्क पेनकिलर्स घेतल्या. बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार स्पेशल सीक्वेंस शूट करण्यासाठी आमिरला धावायचे होते. याकारण्यासाठी त्याला पेनकिलर्स घ्याव्या लागल्या.   

या सिनेमाच्या शूटिंग देशातल्या विविध भागात होणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.

लाल सिंग चड्ढा चित्रपटातून आमिर खान दोन वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. शेवटचा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’मध्ये झळकला होता. ‘लाल सिंग चड्ढा’ चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात आमिरसोबत करीना कपूरसुद्धा दिसणार आहेत. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे.

टॅग्स :आमिर खान