Join us  

आमिर खाननं मध्येच थांबवलं 'लाल सिंग चड्ढा'चे शूटिंग, जयपूरला झाला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 5:23 PM

आमिर खानने आपल्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंगमध्येच बंद केले आहे. 

 बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या मैत्रीचे किस्से प्रसिद्ध आहेत.  तो मित्रांना  कधीही विसरत  नाही असे म्हणतात. असेच काहीतरी आता पुन्हा पाहायला मिळालं आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार आमिर २० वर्षांची मैत्री पूर्ण करण्यासाठी जयपूरला रवाना झाला आहे.  आमिर खान आणि त्याचा जुना मित्र अमीन हाजीची मैत्री फार जुनी आहे.

अभिनयानंतर अमीन दिग्दर्शनाच्या जगात पाऊल टाकणार आहे.  त्याच्या चित्रपटाचे शूटिंग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. आपल्या मित्राच्या या सिनेमात आमिर एका कॅमिओमध्ये दिसणार आहे.  विशेष म्हणजे मिस्टर परफेक्शनिस्ट मानल्या जाणार्‍या आमिर खानने आपल्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंगमध्येच बंद केले आहे. रिपोर्टनुसार जेव्हा अमीनने आमिरला सांगितले की तो थ्रिलर चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे, तेव्हा आमिरला हे ऐकून आनंद झाला.  त्याने अमीनच्या चित्रपटात  कॅमिओला करायचे मान्य केले.

आमिरने आपल्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग मध्येच थांबवले आहे आणि कॅमिओ शूट करण्यासाठी तो जयपूरला रवाना झाला आहे. जयपूरमधील एका स्टुडिओमध्ये तो ५ दिवस एली अवरामबरोबर गाण्याचे शूट करणार आहे.  या गाण्यासाठी एक मोठा सेट तयार करण्यात आला आहे. या गाण्याला संगीत  तनिष्क बागची यांनी दिले आहे, तर गाण्याचे गीतकार अमिताभ भट्टाचार्य आहेत. 

टॅग्स :आमिर खान