Join us  

‘Thugs of Hindostan’ ला पहिल्या दिवशी मिळणार का ५० कोटींचे ओपनिंग?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:27 PM

‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा  कुठलाही मोठा चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही  कुठलाही मोठा चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्सआॅफिसवर आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे.

सणासुदीच्या आणि सुट्टीच्या हंगामाचा बॉक्सआॅफिसवर आलेल्या चित्रपटांना फायदा होतो, हे तर सर्वश्रूत आहे. आजपर्यंत अनेकदा हे सिद्ध झाले आहे. अलीकडचे उदाहरण द्यायचे झाल्यास अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते’ या दोन चित्रपटांचे देता येईल. यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर आलेल्या या दोन्ही चित्रपटांनी पहिल्या दिवशी अनुक्रमे २५.२५ कोटी आणि १९.५० कोटी रूपयांची कमाई करत सगळ्यांना अनपेक्षितरित्या धक्का दिला होता. यानंतर या चित्रपटांच्या कमाईला घसरण लागली. पण पहिल्या दिवशीच्या कमाईने या दोन्ही चित्रपटांना ‘सेफ झोन’मध्ये ठेवले. आता दिवाळीला दोन महिने राहिले आहेत आणि दिवाळीच्या मुहूर्तावर एक बिग बजेट चित्रपट रिलीज होतोय. या चित्रपटाचे नाव आहे, ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’. आमिर खान, अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख अशी दमदार कलाकार असलेल्या या चित्रपटांकडे प्रेक्षक डोळे लावून बसले आहेत. खरे तर दिवाळीच्या मुहूर्तावर सगळे लोक पूजाअर्चेत व्यस्त असतात. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी रिलीज झालेल्या चित्रपटाच्या कमाईचे आकडे फार मोठे नसतात.   ईद व रमजान आणि दस-याच्या काळातील चित्र यापेक्षा पूर्णपणे वेगळे दिसते. अर्थात दिवाळीच्या नंतर येणाºया सुट्टीचा फायदा चित्रपटाला मिळतो. यामुळे अनेकदा दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट रिलीज करण्यास मेकर्स कचरतात. पहिल्याच दिवशी चित्रपटाबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया आली तर सुट्ट्यांचा फायदा मिळणार नाही, अशी भीती मेकर्सला वाटते. पण आमिर खानच्याठग्स आॅफ हिंदोस्तान’ बद्दल असे म्हणता येणार नाही. चित्रपटाचे फर्स्ट लूक पाहूनचं लोक या चित्रपटाच्या प्रेमात पडलेले दिसताहेत.

दिवाळीच्या नंतरच्या सुट्टीच्या काळात बॉक्सआॅफिस कलेक्शनवर याचा परिणाम होणे अपेक्षित आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’च्या रिलीजआधी एक आठवडा  कुठलाही चित्रपट रिलीज होणारा नाही. रिलीजनंतरच्या तीन आठवडेही  कुठलाही मोठा चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज होत नसल्याने बॉक्सआॅफिसवर आमिरच्या ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ला मोठा फायदा होणे निश्चित मानले जात आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’चे मेकर्सही ही अपेक्षा धरून चालले आहेत. पहिल्या दिवशी हा चित्रपट ५० कोटींचे ओपनिंग घेईल, अशी अपेक्षा मेकर्स बाळगून आहेत. आता मेकर्सची ही अपेक्षा किती प्रमाणात खरी होते, ते बघूच.

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तानआमिर खानअमिताभ बच्चन