Join us  

आमिरच्या 'फना'मधील बालकलाकार आठवतो का? आता स्मार्टनेस अन् पर्सनालिटीमुळे जिंकतोय तरुणींची मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 2:34 PM

Ali haji: 'फना' सिनेमानंतर अली काही मोजक्या सिनेमात झळकला. मात्र, त्यानंतर त्याने काही काळ इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. परंतु, आता तो पुन्हा कलाविश्वात सक्रीय झाला आहे.

कलाविश्वात कायमच सुपरस्टार्सची चर्चा रंगत असते. मात्र, या कलाकारांच्या गर्दीत असे काही बालकलाकार असतात जे सगळं लाइमलाइट त्यांच्याकडे खेचून घेतात. यात असे अनेक बालकलाकार आहेत जे सलमान खान(salman khan), आमिर खान (aamir khan) यांच्यासोबत झळकले असून त्यांनी सुपरस्टार्स इतकीच लोकप्रियता मिळवली आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका चाइल्ड आर्टिस्टची चर्चा रंगली असून तो सध्या काय करतो? कसा दिसतो? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

सध्या सोशल मीडियावर २००६ साली रिलीज झालेल्या फना या सिनेमातील बालकलाकाराची चर्चा रंगली आहे. या सिनेमात  अली हाजी या चिमुकल्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. या सिनेमानंतर तो सलमान खानच्या पार्टनर या सिनेमातही झळकला. त्यामुळे सध्या तो काय करतो? हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. म्हणूनच त्याच्याविषयी जाणून घेऊयात.

अली हाजी याने अनेक सिनेमांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं आहे. 'फना', 'पार्टनर' या सिनेमात काम केल्यानंतर त्याने काही काळ इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला होता. अलीने त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं यासाठी त्याच्या पालकांनी काही प्रोजेक्ट्सला नकार दिला होता. परंतु, आता अली २४ वर्षांचा झाला असून तो पुन्हा एकदा इंडस्ट्रीकडे वळला आहे.

दरम्यान, अली अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकदेखील आहे. ‘बॉम्बे ब्लिट्स’, ‘नैना दा क्या कसूर’, ‘#goals’ यांसारख्या लघुपटांचं दिग्दर्शन त्याने केलं आहे. तसंच मिका सिंगच्या ‘छोरी’ या गाण्याच्या व्हिडीओचं दिग्दर्शनसुद्धा त्यानेच केलंय. 

टॅग्स :बॉलिवूडआमिर खानसलमान खानसेलिब्रिटीसिनेमा