Join us

Video - सलमान खानच्या बहिणीचं लग्न, आमिरने गायलं गाणं; आनंदाने नाचली एक्स वाईफ अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 17:01 IST

अर्पिताच्या लग्नात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खूप धमाल केली होती. आमिरची एक्स वाईफ किरण रावनेही जोरदार डान्स केला.

अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खानने अभिनेता आयुष शर्मासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहेत, पण आजही चर्चा होतच असते. अर्पिताच्या लग्नात मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने खूप धमाल केली होती. आमिरची एक्स वाईफ किरण रावनेही जोरदार डान्स केला. आता अनेक वर्षांनंतरही अर्पिताच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

आमिर खान केवळ एक सक्षम अभिनेता आणि चित्रपट निर्माता नाही तर तो एक चांगला गायक देखील आहे. आमिर नेहमी असाच शांत असतो, पण भाईजानच्या बहिणीच्या लग्नात त्याची स्टाइल पाहण्यासारखी होती. आमिरचा हा थ्रोबॅक व्हिडीओ पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आमिर माईक हातात धरून गात होता आणि किरण राव नाचत होती, तर सलमानही हे सर्व पाहत होता. 

2014 मध्ये हैदराबादच्या ताज फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता आणि आयुष शर्मा यांचा विवाहसोहळा पार पडला होता. या लग्नात बॉलिवूडचे बहुतेक स्टार्स पोहोचले होते. मिका सिंगसोबत आमिर खानही मंचावर उपस्थित होता. आमिरने त्याच्या 'गुलाम' चित्रपटातील 'ए क्या बोलती तू' हे हिट गाणे गायला सुरुवात केली. दरम्यान, आमिरला गाताना पाहून सलमानने किरणचा हात धरून तिला स्टेजवर आणले. पांढरा फ्रॉक घातलेली किरण रावही नाचू लागली. 

अर्पिता आणि आयुषच्या लग्नात आमिर खानही मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसला होता. सलमानने त्याच्या इन्स्टाग्रामवर आमिरचा एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये आमिर इतर भावांसह वधू अर्पिताला स्टेजवर घेऊन जात होता. आता अर्पिता आणि आयुष आता दोन गोड मुलांचे पालक झाले आहेत, सलमान अनेकदा त्यांच्यासोबत मस्ती करताना दिसतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :सलमान खानआमिर खानलग्न