Join us  

"आमिर खानची लेकच असं करु शकते" आयराला 'तो' फोटो शेअर करणं पडलं महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 1:06 PM

आयराने तिच्या गँगसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत.

आमिर खानची (Aamir Khan) लेक आयरा खानने (Ira Khan) नुकतंच लाँग टाईम बॉयफ्रेंड फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत (Nupur Shikhare) लग्न केलं. आधी रजिस्टर मॅरेज आणि नंतर उदयपूरमध्ये दोघंही ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. तीन दिवसांपूर्वीच त्यांनी मुंबईत ग्रँड रिसेप्शन पार्टीही दिली. आयराने सोशल मीडियावर लग्नाआधीचे काही क्षण असं म्हणत कॅज्युअल फोटो शेअर केले आहेत. यातला शेवटचा फोटो मात्र वादात अडकला आहे. त्या फोटोवरुन आयरा ट्रोल होत आहे.

आयराने तिच्या गँगसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. प्री-वेडिंग थिंग्स असं तिने कॅप्शन दिलं आहे. चेहऱ्याला मास्क लावून ती मैत्रिणीसोबत आरामात झोपली आहे, तर दुसऱ्या फोटोत ती नुपूरसोबत लॉनवर निवांत बसली आहे. कुटुंबातील सदस्य आणि मित्रपरिवारासोबतचे काही फोटोही तिने शेअर केले आहेत. शेवटचा फोटो मात्र नेटकऱ्यांना खटकला आहे. यात तिने तोंडात सिगारेट धरली आहे. आयराने मेकअप केला असून तिच्या हेअरस्टाईलचं काम सुरु असल्याचं दिसतंय.  दरम्यान आयराने असाच कॅज्युअल सेल्फी शेअर केला असून त्यात तिने तोंडात सिगारेट धरली आहे. 

'सिगारेट फोटो चांगली गोष्ट नाही' असं म्हणत तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. अशा निर्लज्जपणावर आमिर खानची लेकच उतरु शकते अशीही नेटकऱ्यांनी कमेंट केली आहे. तर आणखी एकाने तिला तिच्या चांगुलपणाची आठवण करुन दिली आहे. 'लोक तुला तुझ्या चांगल्या सवयींमुळे फॉलो करतात आणि तू स्वत:चीच प्रतिमा मलीन करत आहेस' अशी कमेंट त्याने केली आहे. 

टॅग्स :इरा खानआमिर खानबॉलिवूडसोशल मीडियाट्रोल