Join us

अनेकदा मी घरी येऊ रडायचो...! ‘कयामत से कयामत तक’नंतर अशी झाली होती आमिर खानची अवस्था

By रूपाली मुधोळकर | Updated: October 6, 2020 15:14 IST

आज आमिर खान बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता...

ठळक मुद्देआमिर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे.

आज आमिर खान बॉलिवूडचा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.   पण इथपर्यंतचा त्याचा प्रवास खचितच सोपा नव्हता. करिअरच्या एका वळणावर आमिर इतका हताश झाला होता की, घरी येऊन अनेकदा रडायचा. हे आम्ही नाही तर खुद्द आमिरनेच सांगितले आहे.बेनेट युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना आमिरने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितले. तो म्हणाला, ‘कयामत से कयामत तक या सिनेमानंतर मी 8 ते 9 सिनेमे साईन केले होते. निश्चितपणे चांगल्या स्क्रिप्टचेच सिनेमे मी निवडले होते. पण त्यावेळी सर्व दिग्दर्शक माझ्यासाठी नवे होते. अशात माझा एकही सिनेमा चालणार नाही, अशा चर्चा मीडियात सुरू झाल्या होत्या. झालेही तसेच. माझे करिअर  उद्धवस्त होत होते. मी 8-9 सिनेमे साईन करून घाई तर केली नाही? असा एकच प्रश्न मला छळत होता. मी खूप दु:खी होतो. अनेकदा तर मी घरी येऊन रडलो. अगदी ढसाढसा रडतो होतो.’

आता सर्व काही संपले... पुढे तो म्हणाला, ‘कयामत से कयामत तक या सिनेमानंतरची दोन वर्षे मी खूप दु:खात काढली. अक्षरश: मी हतबल झालो होता. मी साईन केलेले सिनेमे प्रदर्शनानंतर धडाधड फ्लॉप होत होते. आता सर्व काही संपले, असे त्याक्षणी मला वाटू लागले होते. आता बॉलिवूडमध्ये राहण्यात काहीही अर्थ नाही, असे मला वाटत होते. कारण माझे येणारे सिनेमेही फ्लॉप होणार, हे मी जाणून होतो.’

 मी निर्णय घेतलाच...अखेर मी निर्णय घेतलाच. करिअर उद्धवस्त झाले तरी चालेल. पण उत्तम दिग्दर्शक, उत्तम निर्माता व उत्तम कथा मिळत नाही तोपर्यंत एकही सिनेमा साईन करणार नाही, असा निर्णय मी घेतला, असेही आमिरने यावेळी सांगितले.

‘पीके’तील हा Deleted Scene पाहून संतापले सुशांतचे फॅन्स; उत्तर द्या, म्हणत काढली भडास

तुर्कीच्या ‘फर्स्ट लेडी’ची भेट आमिर खानला पडली महाग, सोशल मीडियावर झाला जबरदस्त ट्रोल

आमिर सध्या ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात बिझी आहे. हा हॉलिवूडचा ‘फॉरेस्ट गम्प’ या चित्रपटाच्या रिमेक आहे. 1994 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात टॉम हंक्स आणि रॉबिन राईट यांनी मुख्य भूमिका साकारली आहे.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे. यात आमिर सरदारजीच्या भूमिकेत दिसेल.

टॅग्स :आमिर खान