Join us

"मी गौरीसोबत लग्न केलंय...", आमिर खानचा मोठा खुलासा, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 16:06 IST

आमिरने त्याच्या वाढदिवशी सगळ्यांसमोर गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. आता आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत तिसरं लग्न केल्याचा खुलासाही केला आहे. 

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनयातील करिअरसोबतच त्याच्या पर्सनल लाइफमुळेही चर्चेत असतो. किरण रावशी घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खान आता गौरी स्प्रैटल डेट करत आहे. आमिरने त्याच्या वाढदिवशी सगळ्यांसमोर गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत खुलासा केला होता. आता आमिरने गर्लफ्रेंड गौरी स्प्रैटसोबत तिसरं लग्न केल्याचा खुलासाही केला आहे. 

आमिरने नुकतीच इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने गर्लफ्रेंड गौरीसोबतच्या रिलेशनशिपबाबत भाष्य केलं. आमिर म्हणाला, "मी आणि गौरी एकमेकांप्रती सिरियस आहोत. आम्ही एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये आहोत. आणि आम्ही पार्टनर आहोत हे तुम्हालाही माहीत आहे. लग्न ही एक अशी गोष्ट आहे म्हणजे मी माझ्यात मनात आधीच गौरीसोबत लग्न केलं आहे. पण, याचा निर्णय मी पुढे जाऊनच घेईन". 

आमिरने रीना दत्तासोबत पहिलं लग्न केलं होतं. त्यांना जुनैद आणि इरा ही दोन मुले आहेत. लग्नानंतर १६ वर्षांनी घटस्फोट घेत रीना आणि आमिर वेगळे झाले. त्यानंतर २००५ मध्ये त्याने किरण रावशी पुन्हा संसार थाटला. पण, २०२१मध्ये त्यांचादेखील घटस्फोट झाला. आता आमिर गौरी स्प्रैटला डेट करत आहे. 

टॅग्स :आमिर खानसेलिब्रिटी