Join us  

वाढदिवशी आमिर खानचं चाहत्यांना सरप्राईज, 'अंदाज अपना अपना'च्या सीक्वेलविषयी दिलं अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 10:55 AM

आमिर-सलमान पुन्हा एकत्र येणार?

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने (Aamir Khan) काल 59 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या प्रोडक्शनअंतर्गत बनलेल्या 'लापता लेडीज' सिनेमाच्या टीमसोबत त्याने केक कापला. यावेळी त्याची एक्स वाईफ आणि सिनेमाची दिग्दर्शक किरण राव त्याच्यासोबत होती. आमिरने वाढदिवशी चाहत्यांना एक गिफ्ट दिलंय. 90 च्या दशकातील सुपरहिट सिनेमा 'अंदाज अपना अपना'च्या सीक्वेलविषयी त्याने माहिती दिली. या आयकॉनिक सिनेमाचा सीक्वेल खरंच येणार का हे स्पष्ट झालं आहे.

राजकुमार संतोषी यांचा 'अंदाज अपना अपना' हा सिनेमा ३० वर्षांपूर्वी रिलीज झाला होता. या कॉमेडी सिनेमात सलमान खान आणि आमिर खान या जोडीने खूप धमाल केली. त्यांच्या सोबतीला करिष्मा कपूर आणि रवीना टंडन दोघीही होत्या. एकंदरच सिनेमात तुफान कॉमेजडी, एक से एक गाणी होती. दरम्यान इतक्या वर्षांनंतर सिनेमाच्या सीक्वेलची चर्चा आहे. या चर्चांवर आमिर खान म्हणाला, "राजकुमार संतोषी अंदाज अपना अपना 2 च्या स्क्रीप्टवर काम करत आहेत. हे सध्या अगदीच सुरुवातीच्या स्टेजवर आहे. त्यामुळे इतक्यात यासाठी उत्साहित होणं थोडं घाईचं ठरेल."

1994 साली 'अंदाज अपना अपना' सिनेमाने बॉक्सऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिर-सलमान आणि करिष्मा-रवीना यांच्यातील भांडणंही चर्चेत होती. मात्र जेव्हा सिनेमा टेलिव्हिजनवर आला तेव्हा त्याची तुफान माऊथ पब्लिसिटी झाली. प्रेक्षक सिनेमा पाहून तुफान हसले आणि परत परत पाहू लागले. आजही हा सिनेमा लागला की सिनेप्रेमींना पुन्हा चित्रपट पाहण्याचा मोह आवरत नाही.  

टॅग्स :आमिर खानसलमान खानसिनेमाबॉलिवूड