Join us
Daily Top 2Weekly Top 5

आमिर खानने भारत-चीनमधील तणावामुळे 'लाल सिंग चड्ढा'च्या लडाखमधील शूटिंगबाबत घेतला मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 15:41 IST

या सिनेमातील एका भागाचे शूटिंग लडाढमध्ये होणार होते.

गेल्या काही दिवसांपासून भारत व चीन यांच्यात लडाखमध्ये सीमेवरून तणाव आहे. याच कारणावरुन आमिर खानने लाल सिंग चड्ढाचे लडाखमध्ये होणारे शूटिंग रद्द केले आहे. या सिनेमातील एका भागाचे शूटिंग लडाढमध्ये होणार होते. भारत-चीनमधील लडाढमधील वाढता तणाव बघून आमिरने शूटिंग करण्यास नकार दिला आहे.

फिल्मी बिटच्या रिपोर्टनुसार आता हे शूटिंग कारगिलमध्ये होणार आहे मात्र त्याचे शेड्यूल अद्याप ठरलेले नाही. आमिरचा ‘लाल सिंग चड्ढा’ हा सिनेमा‘फॉरेस्ट गम्प’ या ऑस्कर विजेत्या चित्रपटाचा रिमेक असणार आहे. १९९४ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जगभरातील प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते.लाल सिंग चड्ढा या चित्रपटात जवळजवळ सत्तरीच्या दशकापासून आजपर्यंतचा काळ दाखवण्यात येणार आहे.

त्यामुळे या चित्रपटात आणीबाणीपासून, कारगिल युद्ध, पुलवामा हमला, उरी हमला, तेव्हापासून आतापर्यंत बदललेली अनेक सरकारं या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिनेमात करीना कपूर आमिरसोबत दिसणार आहे. ‘लाल सिंग चड्ढा’ हा चित्रपट अद्वैत चंदन दिग्दर्शित करणार आहे. अद्वैतने यापूर्वी ‘सीक्रेट सुपरस्टार’ हा चित्रपट दिग्दर्शित केला होता.

 

टॅग्स :आमिर खान