Join us  

‘८३’ या चित्रपटातील आदिनाथ कोठारेचा लूक तुम्ही पाहिला का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 4:06 PM

'८३' या चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये आदिनाथ कोठारेचा लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देया पोस्टरमध्ये आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या या पोस्टरवर नेटिझन्सच्या शानदार प्रतिक्रिया येत आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे. '८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत आणि या चित्रपटाचे आता आणखी एक पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. ज्यात आपला मराठमोळा अभिनेता आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत दिसत आहे. चित्रपटाच्या या पोस्टरवर नेटिझन्सच्या शानदार प्रतिक्रिया येत आहेत.

नुकत्याच ‘८३’ च्या निर्मात्यांकडून सुनील गावस्कर यांच्या भूमिकेसाठी ताहिर राज भसीन, के. श्रीकांत यांच्या भूमिकेसाठी जीवा, मोहिंदर अमरनाथ यांच्या रूपात साकिब सलीम, यशपाल शर्मा यांच्या भूमिकेत जतिन सरना, संदीप पाटिल यांच्या रूपात चिराग पाटिल, कीर्ती आझाद यांच्यासाठी दिनकर शर्मा, रोजर बिन्नी यांच्या भूमिकेसाठी निशांत दहिया, मदन लाल यांच्यासाठी हार्डी संधू आणि सैयद किरमानी यांच्यासाठी साहिल खट्टर तसेच बलविंदर सिंह संधू यांच्या भूमिकेसाठी एम्मी विर्क यांचे फर्स्ट लुक पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.

या दिग्गज नावांमध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेसाठी आदिनाथ कोठारेच्या नावाची वर्णी लागली आहे.  

आदिनाथ हा ८३ या चित्रपटाचा भाग असणार असल्याचे त्यानेच सांगितले होते. या चित्रपटाच्या भूमिकेविषयी बोलताना त्याने म्हटले होते की, या चित्रपटात मी दिलीप वेंसरकर यांची भूमिका साकारणार आहे. मला क्रिकेट हा खेळ लहानपणापासूनच आवडतो. हा खेळ खेळण्यात आणि तो पाहाण्यातच माझे बालपण गेले असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी प्रचंड खूश आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बलविंदर सिंग संधू, यशपाल शर्मा, कपिल देव यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले.

टॅग्स :आदिनाथ कोठारे८३ सिनेमा