Join us  

72 Hoorain Trailer: सेन्सॉर बोर्डानं नाकारल्यानंतरही निर्मात्यांनी '७२ हुरें'चा ट्रेलर केला रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 4:30 PM

72 Hoorain Movie: '७२ हुरें' हा चित्रपट दहशतवादाचे क्रूर वास्तव दाखवतो.

संजय पूरण सिंग यांच्या ७२ हुरें (72 Hoorain) या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा ट्रेलर क्लिअर केला नसला तरी निर्मात्यांनी त्याचा ट्रेलर रिलीज केला आहे. चित्रपटाचे सहनिर्माते अशोक पंडित सांगतात की, ट्रेलरमध्ये मृतदेहाचा पाय दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाचा आक्षेप आहे. सेन्सॉर बोर्डाने हा सीन हटवण्यास सांगितले होते. तरी हा सीन ट्रेलरमधून हटवण्यात आलेला नाही.

७२ हुरें हा चित्रपट दहशतवादाचे क्रूर वास्तव दाखवतो. यात दहशतवाद्यांना प्रशिक्षणादरम्यान तुमच्या मृत्यूनंतर जन्नतमध्ये ७२ कुमारिका मुली तुमच्या सेवेत राहतील असे आश्वासन देऊन त्यांचे ब्रेनवॉश केले जाते आणि त्यांना इतरांना मारण्यास भाग पाडतात हे दाखवले आहे. या चित्रपटात पवन मल्होत्रा ​​हाकिम अलीच्या भूमिकेत दिसणार असून आमिर बशीर बिलाल अहमदच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचा ट्रेलर केवळ डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे. ते थिएटरमध्ये दाखवले जाणार नाही. हा चित्रपट ७ जुलैला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट हिंदी व्यतिरिक्त इंग्रजी, बंगाली, भोजपुरी, कन्नड, काश्मिरी, मल्याळम, मराठी, पंजाबी, तमिळ, तेलगू या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचा ट्रेलर पास करायला नकार दिल्याबद्दल अशोक पंडित यांनी पीटीआयला सांगितले होते की, सेन्सॉर बोर्डाने आमच्या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रमाणपत्र देण्यास नकार दिल्यामुळे ७२ हुरेंच्या निर्मात्यांना धक्का बसला आहे. एकीकडे तुम्ही या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार दिलात आणि दुसरीकडे या चित्रपटाच्या ट्रेलरला तुम्ही प्रमाणपत्र देत नाही. आम्हाला वाटते की सीबीएफसीमध्ये समस्या आहे. आम्ही CBFC चे अध्यक्ष प्रसून जोशी यांना विनंती करतो की ज्यांनी असा हास्यास्पद निर्णय घेतला आहे. त्यांना काढून टाकावे.