Join us

National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 19:05 IST

७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा आज करण्यात आली आहे.

71st National Film Awards: आज १ ऑगस्ट रोजी ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नवी दिल्लीतील राष्ट्रीय मीडिया केंद्रात पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. यंदाच्या पुरस्कारांसाठी देशभरातील विविध भाषांतील चित्रपट आणि कलाकारांचे नामांकन झाले होते. विविध श्रेणींमध्ये उत्कृष्ट ठरलेल्या कलाकृती व कलाकारांची नावं अखेर जाहीर झाली आहेत. यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री या प्रमुख पुरस्कारांसह इतर मान्यताप्राप्त श्रेणींतील विजेतेही घोषित करण्यात आले.  वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…

'श्यामची आई' या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपटावर मोहोर उमटवली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून 'श्यामची आई' या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.  या सिनेमात संदीप पाठक, गौरी देशपांडे, ओम भूतकर, शर्व गाडगीळ, सारंग साठ्ये, मयुर मोरे, ज्योती चांदेकर, सुनील अभ्यंकर या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तर सुजय डहाके यांनी दिग्दर्शन केलंय.

'जवान' सिनेमासाठी शाहरुख खान आणि '१२वी फेल' या चित्रपटासाठी विक्रांत मेसी यांना संयुक्तरित्या सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. शाहरुखचा हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे.  राणीला 'मिसेस चॅटर्जी विरुद्ध नॉर्वे' या सिनेमासाठी हा पुरस्कार दिला आहे. 

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ – विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पदार्पण चित्रपट- 'आत्मपॅम्फ्लेट' (Aatmapamphlet),  दिग्दर्शक - आशिष बेंडेसर्वोत्तम बालचित्रपट - नाळ २ (Naal 2)सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन -  हुनमान (Hanu-Man)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन  - 'द केरळ स्टोरी' (The Kerala Story)सर्वोत्कृष्ट पटकथा -  'सनफ्लावर वेयर द फर्स्ट वन्स टू नो' (Sunflowers Were the First One to Know)सर्वोत्कृष्ट नॉन-फिचर फिल्म-  Flowering Man (हिंदी)सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- सौम्यजित घोष दस्तिदारसर्वोत्कृष्ट डॉक्यूमेंट्री- गॉड वल्चर अँड ह्युमनसर्वोत्कृष्ट कल्चर फिल्म- टाइमलेस तमिळनाडूसर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गीत) - जी.व्ही. प्रकाश कुमार (वाथी, तमिळ)सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत - हर्षवर्धन रामेश्वर (अॅनिमल)सर्वोत्कृष्ट गीतकार - कासरला श्याम - "ऊरु पल्लीटूरु" (Balagam)सर्वोत्कृष्ट संवाद - दीपक किंगराणी (सिर्फ एक बंदा कॉफी है)सर्वोत्कृष्ट संपादन - मिधुन मुरली (Pookalam)सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी -प्रशांतनु महापात्रा (द केरळ स्टोरी)सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन -सचिन सुधाकरन आणि  हरिहरन मुरलीधरन (Animal)सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन पुरस्कार - रॉकी और रानी की प्रेम कहानी (हिंदी) कोरिओग्राफर : वैभवी मर्चंट

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (मुख्य भूमिकेत)राणी मुखर्जी – मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे (Mrs. Chatterjee vs Norway)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सहाय्यक भूमिकेत)उर्वशी , चित्रपट: Ullozhukku, जानकी बोडीवाला, चित्रपट: Vashi

सर्वोत्कृष्ट अभिनेता (मुख्य भूमिकेत):शाहरुख खान – जवान (Jawan)विक्रांत मेसी –  '१२वी फेल' (12th Fail)सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म - '१२वी फेल' (12th Fail)

सर्वोत्कृष्ट  अभिनेता (सहाय्यक भूमिकेत)विजय राघवन - चित्रपट: Pookkaalam (मल्याळम)मुथुपेट्टई सोमू भास्कर (एम.एस. भास्कर) चित्रपट: Parking (तमिळ)

सर्वोत्कृष्ट बाल कलाकार-सुकृती वेणी बंडरेड्डी, चित्रपट:  गांधी तथा चेत्तु (तेलुगू)कबीर खांडारे,  चित्रपट: जिप्सी (मराठी)त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोळके, भार्गव जगताप, चित्रपट: नाळ २ (मराठी)

फिचर फिल्म्स (मुख्य चित्रपट):

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट- श्यामची आईसर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट- Kandeelu (Ray of Hope)सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट-  कथल - जॅकफ्रूट मिस्ट्रीसर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट- उल्लोझुक्कू सर्वोत्कृष्ट तेलुगू फिल्म- भागावान्थ केसरीसर्वोत्कृष्ट तमिळ फिल्म- पार्किंगसर्वोत्कृष्ट पंजाबी फिल्म- गॉडडे गॉडडे चा (Godday Godday Chaa)सर्वोत्कृष्ट गुजराती सिनेमा- वशसर्वोत्कृष्ट बंगाली सिनेमा- डीप फ्रीजरसर्वोत्कृष्ट आसामी सिनेमा- Rongatapu 1982सर्वोत्कृष्ट ओडिया सिनेमा-पुष्करा

पुरस्कार वितरण समारंभ लवकरच पार पडणार असून, त्यावेळी भारताचे राष्ट्रपती भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम कलाकृतींना हा सन्मान प्रदान करतील. दरम्यान, कोरोना महामारीमुळे एकंदरच चित्रपट क्षेत्रावर आणि अनेक प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांवर मोठा परिणाम झाला. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्येही याचा परिणाम दिसून आला. त्यामुळेच, यंदा जाहीर करण्यात आलेले ७१वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२३ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी देण्यात येत आहेत. 

टॅग्स :राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारशाहरुख खानविक्रांत मेसी