Join us

६४ वा राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळा : अक्षयकुमारचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव, पहा व्हिडीओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2017 20:57 IST

अखेर बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षयकुमार याला आज राष्ट्रपती भवन येथे ६४ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अखेर बॉलिवूडचा मिस्टर खिलाडी अक्षयकुमार याला आज राष्ट्रपती भवन येथे ६४ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या विशेष कार्यक्रमासाठी अक्षय त्याच्या परिवारासह पोहोचला होता. अक्षयला हा पुरस्कार त्याच्या ‘रुस्तम’ या चित्रपटासाठी देण्यात आला. टीनू सुरेश देसाई यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अक्षयने रुस्तम पावरी या नौदल अधिकाºयाची भूमिका साकारली होती. अक्षयने समारंभात सहभागी होण्याअगोदर त्याच्या फेसबुक अकाउंटवर फॅमिलीसोबतचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. फोटोमध्ये पत्नी ट्ंिवकल आणि मुलगा आरव दिसत होता. तत्पूर्वी अक्षयने एक व्हिडीओही शेअर करून तरुणांसाठी एक संदेश दिला होता. आजचा दिवस अक्षयच्या आयुष्यात खूपच स्पेशल असल्याने त्याने अतिशय हटके अंदाजात हा दिवस सेलिब्रेट केला. यावेळी त्याने आपल्या परिवाराला वेळ देणे अधिक महत्त्वपूर्ण समजले. अक्षयला हा पहिला पुरस्कार मिळाला असून, पुरस्कार घोषित झाल्यानंतर त्याच्यावर सर्वदूर टीकाही करण्यात आली होती. अक्षयला घोषित करण्यात आलेला हा पुरस्कार मॅनेज असल्याचे बोलले गेले. काहींनी त्याचे समर्थनही केले. काहींच्या मते अक्षयला हा पुरस्कार केवळ राष्ट्रीयत्वासाठीच देण्यात आला. असो आता अक्षयला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून, हा वाद इथेच संपेल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात सोनम कपूर हिचाही गौरव करण्यात आला. तिच्या ‘नीरजा’ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी हा पुरस्कार दिला गेला. सोहळ्यात अक्षयच्या चेहºयावरील आनंद स्पष्टपणे झळकत होता. अक्षयला मिळालेल्या या राष्ट्रीय पुरस्कारासाठी ‘सीएनएक्स मस्ती’च्या वतीने त्याचे हार्दिक अभिनंदन!ALSO READ : पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी अक्षयकुमारने शेअर केला फॅमिली फोटो!!