Join us

5379_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2016 14:43 IST

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्तरेमधील गगनचुंबी डोंगर ते दक्षिणेमधील प्रसन्नता सारं काही या देशात आहे. भारतामधील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.

उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या की भारतामध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर जाणवतो. उन्हापासून संरक्षण मिळावे म्हणून प्रत्येकजण धडपड करीत असतो. तथापि हा देश अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने आनंद देत असतो. देशात उन्हापासून वाचण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. उत्तरेमधील गगनचुंबी डोंगर ते दक्षिणेमधील प्रसन्नता सारं काही या देशात आहे. भारतामधील अशाच काही ठिकाणांची माहिती देत आहोत.भारताचे ‘छोटे तिबेट’ असे म्हटले जाणारे लडाख हे भारतामधील भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. उंचच उंच डोंगररांगा, सुंदर तळी आणि आश्चर्यकारक दृष्ये या ठिकाणी पहावयास मिळतात. या ठिकाणी असणारे प्रसन्न वातावरण यामुळे उन्हाळ्यात हे ठिकाण पाहण्यास योग्य आहे.पूर्वोत्तर भाग प्रवासासाठी सुंदर आहे. हिमालय आणि तिस्ता नदीच्या पाण्याचा वेग हे खरोखर पाहण्याजोगे आहे. पूर्वोत्तर भारतामधील सिक्कीम हे राज्य तणावमुक्त होण्यासाठी सर्वोत्तम आहे. उन्हाळ्यात या ठिकाणी नक्की जा.पीर पंजाल आणि दौलधार या हिमालयाच्या रांगामध्ये मनाली वसले आहे. उन्हाळ्यात जाण्याजोगे हे आणखी एक सुंदर ठिकाण. पॅराग्लायडिंग, वॉटर राफ्टिंग, ट्रेकिंग हे सारे काही या ठिकाणी करु शकता. सोलंग खोºयात तुम्हाला बरेच काही दिसू शकते.भारतामधील अत्यंत लोकप्रिय ठिकाण म्हणून अंदमान आणि निकोबारकडे पाहिले जाते. रम्य अशा समुद्रकिनारी काही मनोरंजनीय खेळांचा लाभ घेता येऊ शकतो.भारताचा स्वर्ग म्हणून काश्मीरकडे पाहिले जाते. गुलमर्ग, श्रीनगर, पहलगाम या ठिकाणी पर्यटकांची खूप गर्दी असते. सूर्यास्त होताना पाहणे हे अगदी रोमांचक असते. काही ठिकाणी तुम्हाला विविध कार्यक्रमही या ठिकाणी पाहण्यास मिळतात.समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर असलेले सातारा जिल्ह्यातील हे ठिकाण उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. याठिकाणी अनेक ‘पॉर्इंटस्’ आहेत. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत पाहण्याजोगे बरेच काही आहे. बोेटिंग, ट्रेकिंगचा आनंद लुटता येतो.निसर्ग सौंदर्य पहावयाचे असेल तर दार्जिलिंगसारखे ठिकाण नाही. सभोवताली असणारे चहाचे मळे आणि मनोहारी सौंदर्य या ठिकाणी अनुभवता येतो. हिमालय पर्वतरांगांना पाहताना तुम्ही अनेक सुंदर दृष्ये अनुभवू शकता.