Join us

5272_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 15:17 IST

फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला उद्योजिका २०१६’ या यादीत ८ भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यांची माहिती देत आहोत.

फोर्ब्सने आशियातील अत्यंत शक्तीशाली महिला उद्योजिकांची यादी जाहीर केलीय. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानी यांना पहिले स्थान देण्यात आले आहे. स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अरुंधती भट्टाचार्य या दुसºया क्रमांकावर आहेत. ‘आशियाच्या ५० यशस्वी महिला उद्योजिका २०१६’ या यादीत ८ भारतीय महिलांचा समावेश आहे. त्यांची माहिती देत आहोत.ज्या देशात अब्जाधीशांच्या पत्नी या आपल्या नवºयाच्या सावलीप्रमाणे वावरतात, त्या देशात नीता अंबानी यांचे रिलायन्समधील उभरते व्यक्तीमत्व, त्यांचे स्थान दर्शविते. त्यामुळे या यादीत त्यांना सर्वोच्च स्थान देण्यात आले आहे.अरुंधती भट्टाचार्य या भारतामधील सर्वात मोठ्या असणाºया स्टेट बँक आॅफ इंडियामधील सर्व आव्हानांना सामोरे जात आहेत. कर्ज डोक्यावर असताना त्यांच्यामुळे या तिमाहीमधील नफा हा ६० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला.या फेब्रुवारी महिन्यात एमयु सिग्मा या कंपनीच्या पहिला महिला बॉस म्हणून अम्बिगा धीरज यांनी पदभार स्वीकारला. डाटा अ‍ॅनॅलिसीस सेवा देणाºया या कंपनीची सूत्रे त्यांनी आपले पती धीरज राजाराम यांच्याकडून घेतली. त्यांनी २००४ साली ही कंपनी सुरु केली होती.पाच वर्षापूर्वी जेव्हा गोएन्का यांनी वेलस्पन इंडियाचा पदभार घेतला होता, त्यावेळी हे क्षेत्र पुरुषसत्ताक होते. ‘वेलस्पनने आपला विचार गमावला’ अशा शब्दात त्यावेळी प्रतिक्रिया आल्या होत्या. गोएन्का यांनी हे सारे खोटे ठरविले.गुप्ता या भारतामधील तिसºया क्रमांकाचीं औषध कंपनी चालवितात. त्यांनी ८८० दशलक्ष डॉलर्सची गेविस फार्मा ही कंपनी विकत घेतली. यामुळे लुपिनला पहिल्यांदा अमेरिकेत निर्मितीला वाव मिळाला.महिला अधिकाºयांची संख्या पाहून चंदा कोचर यांनी आयवर्क अ‍ॅट होम ही संकल्पना राबविली. यामुळे घरातून काम करण्यास संधी मिळाली. त्याशिवाय अधिकाºयांना ३ वर्षाखालील मुलांना घेऊन बिझनेस ट्रीप्सना जाता आले.’सौंदर्य प्रसाधनांची साखळी तयार करण्याची कल्पना ही वंदना लुथरा यांनी समोर आणली. १९८९ साली त्यांनी नवी दिल्लीमध्ये केंद्र उभारले. वजन, केस आणि त्वचेवरील उपाययोजनांसाठी याचा वापर केला जाणार होता. सध्या ११ देशात ३१३ केंद्रे आहेत. आशिया, मध्यपूर्व आणि पश्चिम आफ्रिकेत ही केंद्रे आहेत.स्वत: तयार केलेल्या इन्सुलिनमुळे मुजुमदार-शॉ या बायकॉनमध्ये अग्रभागी राहिल्या. सायन्स मॅगेझिनच्या अनुसार बायकॉन ही बायोटेकमधील जगभरातील प्रमुख २० कंपन्यांपैकी एक आहे.