Join us

5216_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 15:00 IST

पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणकडे भारतामध्ये विविध रंग, संस्कृती, भाषा, परंपरा, श्रद्धा आणि धर्म आहेत. इमारतींची रचना आणि वास्तूकला देखील वेगवेगळ्या आहेत. यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय भारताचा असणारा श्रीमंत इतिहास आणि इतर सिद्धांत पाहण्याजोगे आहेत. अशाच काही स्मारकांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेपासून दक्षिणकडे भारतामध्ये विविध रंग, संस्कृती, भाषा, परंपरा, श्रद्धा आणि धर्म आहेत. इमारतींची रचना आणि वास्तूकला देखील वेगवेगळ्या आहेत. यामुळे संपूर्ण भारतामध्ये अनेक ऐतिहासिक स्मारके आणि वारसास्थळे उभारण्यात आली आहेत. त्याशिवाय भारताचा असणारा श्रीमंत इतिहास आणि इतर सिद्धांत पाहण्याजोगे आहेत. अशाच काही स्मारकांची माहिती या ठिकाणी देत आहोत.रवींद्रनाथ टागोर यांच्यामते ताजमहल म्हणजे ‘काळाच्या गालावरील अश्रू’ होय. १९८३ पासून हे ठिकाण जागतिक वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील आगरा येथे उभारण्यात आलेला संगमरवरी बांधकामाचा हा उत्कृष्ट नमुना होय. १६४८ साली मुघल सम्राट शहाजहानने याची निर्मिती केली. १६३० साली शहाजहानची प्रिय पत्नी मुमताज महल वारल्यानंतर तिच्या स्मृतीप्रित्यर्थ ही सुंदर इमारत बांधली. १६३१ साली याची सुरुवात झाली. १७ वर्षे याचे बांधकाम सुरू होते. २२ हजार नोकर यासाठी राबत होते. पंजाबहून सूर्यमणी, तिबेटहून नीलमणी, श्रीलंकेहून आकाशी रंगाचे मणी, चीनहून स्फटीक, त्याचपद्धतीने २८ विविध प्रकारचे उच्च दगड वापरण्यात आले आहेत. त्या काळी यासाठी ३.२ कोटी रुपये खर्च आला होता. जगातील सात आश्चर्यापेैकी हे एक असून, दरवर्षी सुमारे ३० लाखाहून अधिक लोक भेट देत असतात.म्हैसूरच्या राजाचे निवासस्थान असणाºया या राजवाड्याला ताजमहल नंतर सर्वाधिक लोक भेट देत असतात. १८९७ साली याची सुरुवात झाली आणि १९१२ रोजी हे पूर्ण झाले. जगात अशा प्रकारचे बांधकाम तुम्हाला दुसरीकडे कोठेही आढळणार नाही. प्रत्येक ठिकाणी राजेशाहीची छाप दिसून येते. इंग्लंडच्या राणीच्या राजवाड्याची भारतामधील ही प्रतिकृती असल्याचे जाणवते. प्रेक्षागृह, खास लोकांसाठी मोठा हॉल, राज दरबार, ज्या ठिकाणी राजे लोकांच्या अडचणी समजावून घेतील असा दिवान-ए-आम, शाही लग्न हॉल, शस्त्रागार यांचा यात समावेश आहे.जयपूरमधील सर्वात लोकप्रिय ठिकाण. १७९९ साली सवाई प्रताप सिंग यांनी श्रीकृष्णाच्या मुकुटापासून प्रेरणा घेऊन याची उभारणी केली. ही पाच मजली इमारत असून, यात छोट्यामोठ्या ९५३ खिडक्या आहेत. यातून शाही परिवाराच्या महिलांना शहर पाहता येत होते. लाल आणि गुलाबी रंगाच्या दगडात याची उभारणी करण्यात आली असून, यात हवा खेळती राहते. उन्हाळ्यात देखील हवा थंड राहते.१३ व्या शतकात बांधण्यात आलेले कोणार्क सूर्यमंदिर ओडिशामध्ये आहे. राजा नरसिंहदेव यांनी खास दगडातील हे मंदिर बांधले. त्याचवेळी या मंदिराविषयी अनेक कथा आहेत. श्रीकृष्णाचा मुलगा सांब याला सूर्याच्या कोपाने मोठा रोग झाला. १२ वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्याने हे मंदिर बांधले. गेल्या कित्येक शतकानंतर हे मंदिर अजूनही उभे असून, याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला आहे.१७ व्या शतकात मुगल बादशहा शाहजहानने याची उभारणी केली. जुन्या दिल्लीत याची उभारणी करुन आगºयाहून आपली राजधानी येथे हलविली. १८५७ पर्यंत दिल्ली मुगल साम्राज्याची राजधानी होती आणि लाल किल्ला हा प्रशासनाचा केंद्रबिंदू. १६३८ साली याच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि १६४८ साली हा किल्ला बांधून पूर्ण झाला. प्रत्येक स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताक दिनाला भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्टÑीय ध्वज फडकावतात आणि भाषण देतात.मुंबईच्या समुद्राकाठी ३१ मार्च १९११ साली याच्या उभारणीस प्रारंभ झाला. १९२४ साली हे बांधकाम पूर्ण झाले. राजे पंचम जॉर्ज आणि राणी मेरी यांचे १९११ साली अपोलो बंदरातील आगमनाप्रित्यर्थ हे स्मारक उभारण्यात आले. पूर्वी मुंबईत बोटीने येणाºया प्रत्येकास हे स्मारक दिसत होते. काही दिवसानंतर व्हाईरॉय आणि नवीन प्रशासकांच्या स्वागतासाठी याचा वापर करण्यात येत होता. मुंबईचा ताजमहल असेही याला म्हटले जाते.