Join us

5135_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 15:24 IST

इतिहासाकडे वळून पाहिले असता, समुद्रात झालेले अपघात अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचे आहेत. यामुळे हजारो लोकांना मृत्यृूमुखी पडावे लागले. समुद्रात वेगवेगळ्या कारणांनी अपघात होत असतात. अशाच काही महत्वाच्या आणि मोठ्या अपघातांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

इतिहासाकडे वळून पाहिले असता, समुद्रात झालेले अपघात अत्यंत दुर्दैवी आणि क्रूर पद्धतीचे आहेत. यामुळे हजारो लोकांना मृत्यृूमुखी पडावे लागले. समुद्रात वेगवेगळ्या कारणांनी अपघात होत असतात. अशाच काही महत्वाच्या आणि मोठ्या अपघातांची माहिती या ठिकाणी देत आहोत.२० डिसेंबर १९८७ साली समुद्रात अत्यंत भयानक असा अपघात झाला. फिलीपाईन्सचे प्रवासी जहाज डोना पाझ हे एम. टी. व्हेक्टर या आॅईल वाहणाºया टँकरशी धडकले. दोन्ही जहाजांमध्ये मोठी आग लागली आणि दोन्ही समुद्रात बुडाले. या अपघातात ४,३८६ लोकांना आपले प्राण गमवावे लागले. यापैकी केवळ २४ जणांना वाचविण्यात यश आले. एम. टी. व्हेक्टरवरील १३ पैकी केवळ दोघेच वाचले. अनेकांच्या मते डोना पाझमध्ये अवैधरित्या ४००० लोक प्रवास करीत होते. या जहाजाची क्षमता १५१८ लोकांची होती. यापैकी २१ मृतदेह सापडले. २० शतकातील हा सर्वात मोठा अपघात होता.चीनचे प्रवाशी वाहून नेणारे कियांग्या हे जहाज हुयांग्पू नदीत शांघायपासून ८० किलोमीटर अंतरावर ४ डिसेंबर १९४८ साली बुडाले. यामध्ये २,७५०-३,९२० लोकांचा मृत्यू झाला. यापैकी ७००-१००० लोकांना वाचविण्यात यश आले. दुसºया बोटींचा वापर करुन लोकांना वाचविण्यात आले. दुसºया महायुद्धात जपानच्या नौदलाने या नौकेच्या पाठीमागे बॉम्बस्फोट केल्याने ही नौका बुडाली.६ डिसेंबर १९१७ रोजी माँट ब्लॉक हे मालवाहू जहाज कॅनडाजवळील नोव्हा स्कॉटिका या बंदराकडे जात होते. यामध्ये उच्च क्षमतेची स्फोटके होती. याची नॉर्वेचे जहाज एसएस इमो याच्याशी धडक झाली. याला हॉलिफॅक्स एक्स्प्लोजन असेही म्हणतात. यात २००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले. उडणाºया काचेमुळे ९००० लोक जखमी झाले. आतापर्यंत स्फोटकांमुळे झालेला हा सर्वात मोठा अपघात आहे.समुद्रात झालेल्या मोठ्या अपघातापैकी एक. २६ सप्टेंबर २००२ साली सेनेगल सरकारच्या प्रवासी वाहतूक करणारी फेरी ले जुुलाचा मोठा अपघात झाला. या नौकेत प्रमाणापेक्षा अधिक प्रवाशी भरण्यात आले होते. या नौकेची क्षमता ५३६ प्रवाशांची असताना त्यातून १९२७ जण प्रवास करीत होते. पुरामुळे ही बोट उलटून १८६३ जण मृत्युमुखी पडले.६ फेब्रुवारी १८२२ साली टेक सिंग हे जहाज दक्षिण चीनच्या समुद्रात बेल्विडेर शोल्स भागात बुडाले. बेलितुंग आणि बांगका बेटादरम्यान याला समाधी मिळाली. यामध्ये १६०० जणांचा मृत्यू झाला. अनेकांचे प्राण गेल्याने याला ‘पूर्वेचे टायटॅनिक’ असेही म्हटले जाते.ब्रिटीश प्रवाशांनी भरलेल्या आरएमएस टायटॅनिकला जगभरात सर्वत्र ओळखले जाते. त्या काळातील सर्वात मोठे जहाज होते आणि त्याची बांधणी करणाºयांनी कधीही न बुडणारे असा त्याला दर्जा दिला होता. उत्तर अटलांटिक समुद्रात १५ एप्रिल १९१२ रोजी हिमनगाला धडकून बोट बुडाली. यात १५१७ जणांना आपले प्राण गमवावे लागले.