Join us

४३ वर्षीय रविना टंडनला ‘या’ व्यक्तीने घातली लग्नाची मागणी; उत्तर जाणून तुम्हाला धक्का बसेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 19:45 IST

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती त्या सेलिब्रिटींपैकी आहे, जे देशात घडत असलेल्या अनुचित घटनांवर ...

बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव आहे. ती त्या सेलिब्रिटींपैकी आहे, जे देशात घडत असलेल्या अनुचित घटनांवर अतिशय बिनधास्तपणे आपले मत मांडतात. गेल्या काही दिवसांपूर्वी असेच काहीसे घडले, ज्याचे रविनाने मजेशीर अंदाजात उत्तर दिले. त्याचे झाले असे की, रविनाने महाराष्ट्रासह देशभरात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. तिने ट्विट करून म्हटले होते की, आंदोलनकर्त्या शेतकºयांना कारागृहात टाकायला हवे अन् त्यांचा जामीनही होता कामा नये. रविनाच्या या ट्विटनंतर तिच्या एका चाहत्याने असे काही लिहिले ज्याचे रविनाने लगेचच उत्तरही दिले. वास्तविक सेलिब्रिटी अशाप्रकारच्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळतात. परंतु रविनाने कुठलाही संकोच न बाळगता बिनधास्तपणे चाहत्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. अन्वर अली नावाच्या एका व्यक्तीने रविनाच्या ट्विटला रिप्लाय देताना लिहिले की, ‘वुड यू मॅरी विद मी?’ रविनाने त्याला उत्तर देताना लिहिले, ‘सॉरी यार, तू हे विचारण्यासाठी १३ वर्ष लेट झाला.’ पण रविनाच्या इतर चाहत्यांनी मात्र अन्वरच्या इंग्रजीवर चांगलीच सडकून टीका केली. त्याच्या ट्विटमधील व्याकरणाच्या चुका शोधून अनेकांनी त्याला धारेवर धरले. पण रविनाने त्याला मजेशीर अंदाजात उत्तर देऊन त्याची बोलती बंद केली. दररम्यान, रविनाने बिझनेसमॅन अनिल थडानी यांच्याशी लग्न केले आहे.