3873_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 10:21 IST
बॅँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेले विजय मल्ल्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या जरी मल्ल्या अडचणीत असले तरी त्यांची ‘कॅलेंडर गर्ल’ बनण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक असतात. बॉलीवुडमध्ये सध्या हिट ठरत असलेल्या अशा बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्या कॅलेंडर गर्ल बनल्यानंतर खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. आज त्यातील काही अभिनेत्रींनी बॉलीवुडमध्ये अक्षरश: दबदबा निर्माण केला आहे.
3873_article
बॅँकांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पलायन केलेले विजय मल्ल्या सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सध्या जरी मल्ल्या अडचणीत असले तरी त्यांची ‘कॅलेंडर गर्ल’ बनण्यासाठी जगभरातील मॉडेल्स उत्सुक असतात. बॉलीवुडमध्ये सध्या हिट ठरत असलेल्या अशा बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्या कॅलेंडर गर्ल बनल्यानंतर खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आल्या. आज त्यातील काही अभिनेत्रींनी बॉलीवुडमध्ये अक्षरश: दबदबा निर्माण केला आहे.बॉलीवुडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या कॅटरिना कैफ मल्ल्या यांच्या कॅलेंडर गर्लची एकेकाळची स्टार होती. २००३ मध्ये घोड्याच्या पाठीवर बसुन दिलेल्या पोजचा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर कॅटरिना खºया अर्थाने प्रसिद्धीझोतात आली होती. किंगफिशरने २००३ पासून कॅलेंडर काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी स्विमसूट घातलेल्या मॉडेल्सचे फोटोज् त्यामध्ये असायचे. दीपिकाने २००६ मध्ये किंगफिशर कॅलेंडरमध्ये सहभाग घेतला होता. आज दीपिका बॉलीवुडमधील टॉपची अभिनेत्री आहे. रॉकस्टारमध्ये डेब्यू केलेल्या नर्गिस फाखरीने २००९ मध्ये किंगफिशरच्या कॅडेंरमध्ये फोटोशूट केले होते. क्वीन चित्रपटात प्रशंसा मिळविलेल्या लीजा हेडनने २०११ मध्ये किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये सहभाग घेतला होता. त्यावेळी ती मल्ल्यांची टॉपची मॉडेल होती. ग्रॅँड मस्ती या चित्रपटातील अभिनेत्री ब्रूना अब्दुल्लाह २००७ मध्ये किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये झळकली होती. ‘बापू जी जरा धीरे चलो’ या गाण्यातील आयटम गर्ल याना गुप्ता २००३, २००४ आणि २००५ मध्ये किंगफिशर कॅलेंडरची मॉडेल राहिली आहे. ईशा गुप्ताने २०१० मध्ये कॅलेंडरसाठी हॉट फोटोशूट केले होते. पूनम पांडे हिला न ओळखणारा व्यक्ती क्वचितच असेल. दर दिवसाला कुठल्या ना कुठल्या विषयांवरून ती चर्चेत असते. पूनमने २०१२ मध्ये किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी फोटोशुट केले होते. ब्राजीलची मॉडेल नटालिया कौर हिने राम गोपाल वर्माच्या चित्रपटात सनी लियॉनला रिप्लेस करत आयटम नंबर केला होता. ती २०१२ च्या कॅलेंडरसाठी मॉडेल होती. अंजला जॉनसन २०१२ च्या कॅलेंडरची मॉडेल होती. अंजला आतापर्यंत सलमानसोबत तीन चित्रपटांमध्ये झळकली आहे. शिवाय तिने अनेक चित्रपट साइन केल्याचीही चर्चा आहे.