Join us

3830_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 04:12 IST

फोर्ब्सने भारतामधील १०० सर्वोत्कृष्ट कलाकारांची यादी जाहीर केली. आठ विविध प्रकारात भारतामधील सर्वोत्कृष्ट कलाकारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, क्रिकेट खेळाडू, टी. व्ही.वरील व्यक्ती, गायक, संगीतकार, लेखक, मॉडेल्स, विनोदी अभिनेते यांचा समावेश आहे.

फोर्ब्सने भारतामधील १०० सर्वोत्कृष्ट कलाकारांची यादी जाहीर केली. आठ विविध प्रकारात भारतामधील सर्वोत्कृष्ट कलाकारांची नावे यात जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये अभिनेते, दिग्दर्शक, क्रिकेट खेळाडू, टी. व्ही.वरील व्यक्ती, गायक, संगीतकार, लेखक, मॉडेल्स, विनोदी अभिनेते यांचा समावेश आहे.किंग खानसाठी हे वर्ष खूप छान गेले. त्याच्या डॉन २ आणि रा वन या चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केली. एसआरके ब्रँड हा सक्सेसचा मंत्र आहे.२०१२ साली एक था टायगर हा चित्रपट कमाईच्या दृष्टीने बॉलीवूडमधील दुसºया क्रमांकाचा होता. यापूर्वी आमीर खानच्या थ्री इडिएटने हा पराक्रम केला होता. त्याचा मदतीचा स्वभाव, बिर्इंग ह्युमन, ४०० कैद्यांचा दंड भरण्याची त्याची कामगिरी त्याला वरच्या पदावर नेत गेली.२०१२ साली कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने क्रिकेटच्या मैदानावर मोठी कामगिरी केली. स्वत:ची सुपरबाईक टीम तयार करुन त्याने सर्वांची मने जिंकली.अक्षय कुमारने हाऊसफुल २ आणि राऊडी राठोड या चित्रपटाद्वारे भरपूर कमाई केली. त्याच्या स्टारपदाला आणखी चमक लाभली.२०१२ हे साल अमिताभ बच्चनसाठी बºयापैकी ठरले. इंग्लिश विंग्लीशमधील त्याचा अभिनय सर्वांना भावला.भारतामधील सर्वात गाजलेला क्रिकेटपटू २०१२ साली निवृत्त झाला. त्याने १८,४२६ धावा केल्या.एक मै और एक तू या चित्रपटाने बॉक्स आॅफिसवर फारसे यश मिळविले नसले तरी तलाशने खूप छान यश प्राप्त केले. याच वर्षी तिने सैफ अली खान सोबत लग्न केले.