Join us

3827_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 04:42 IST

एकेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा आढावा...

एकेकाळी बॉलीवुडमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करणाºया सेलिब्रेटींचे मुले बॉलीवुड एंट्रीसाठी तयार आहेत. आगामी चित्रपटांमध्ये हे स्टारकिड्स आपल्या अभिनयाची अदा प्रेक्षकांना दाखवू शकतात. येत्या काळात कोणते स्टारकिड्स पडद्यावर जलवा दाखविणार याचा घेतलेला हा आढावा...पूनम ढिल्लोची मुलगी पलोमा ठाकरिया लवकरच बॉलीवुडमध्ये एंट्री करणार आहे. सद्या पूनम तिचा मुलगा अनमोल ठाकरिया याला प्रमोट करण्यासाठी बिझी असली तरी, पलोमाला अगोदर लॉँच केले जाण्याची शक्यता आहे. पलोमा अतिशय स्टाइलिश आहे.संजय दत्तची मुलगी त्रिशाला विदेशात बिझनेसचे शिक्षण घेत असली तरी लवकरच ती बॉलीवुडमध्ये डेब्यू करण्याची चर्चा आहे. संजूबाबच तिला बॉलीवुडमध्ये लॉँच करू शकतो.संजय दत्तची भाची आणि कुमार गौरवची मुलगी सांची ही देखील खुप स्टाइलिश आहे. ती तिच्या आई-वडिलांसोबत अनेक इवेंट्समध्ये बघावयास मिळाली आहे.सलमान खानची बहीण अलवीरा अग्निहोत्रीची मुलगी अलीजा अग्निहोत्री लवकरच बॉलीवुडपटात झळकणार आहे. अलीजाने यापूर्वीच सोशल मीडियावर तिचे स्टनिंग फोटो शेअर केले आहेत. अलीजाचा मामा सलमान खान तिला लॉँच करणार आहे.अमिताभची नात नव्या सध्या चांगलीच चर्चेत आहे. बीच पार्टी आणि विदेशी मित्रांसोबतचे तिचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. तसेच शाहरूखचा मुलगा आर्यनसोबतची तिची मैत्रिही चर्चेत आहे.अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप सुद्धा बॉलीवुडमधील एंट्रीसाठी तयार आहे. आलिया श्रीदेवीच्या मुलींशी आणि सैफच्या मुलाबरोबर नेहमीच पार्टीत बघावयास मिळते.सैफ आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान करीना आणि सैफच्या लग्नात बघावयास मिळाली होती. अमृता सिंह साराला बॉलीवुडमध्ये लॉँच करण्यासाठी प्रयत्नशील आहे.श्रीदेवीच्या दोन्ही मुली जान्हवी आणि खुशी बॉलीवुडमध्ये एंट्री करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही बहिणीच्या सेल्फी सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. येत्या काही दिवसात भंसाळी जान्हवीला चित्रपटात लॉँच करण्याची घोषणा करू शकतात.मिथुनदाचा मुलगी दिशानी चक्रवर्ती सुद्धा बॉलीवुडमध्ये एंट्री करण्याच्या तयारीत आहे. सध्या मिथुन आणि योगिताबरोबर दिशानी सुद्धा विविध इव्हेंट्समध्ये बघावयास मिळते.स्टाइलिश आणि बोल्ड पूजा बेदीची मुलगी आलिया बेदी सुद्धा तिच्यासारखीच बोल्ड आहे. काही दिवसांपूर्वी आलियाचे बिकनी फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.आमिर खानची मुलगी इरा तिची आई रीना दत्तसोबत राहते. मात्र आमिरला तिला बॉलीवुडमध्ये लॉँच करायचे आहे. तिच्या आईवर गेलेली इरा येत्या काळात बॉलीवुडमध्ये झळकु शकते.जॅकी श्रॉफची मुलगी आजकाल सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत: जॅकीदादानेच मुलगी कृष्णाच्या लाइफमध्ये ढवळाढवळ करणार नसल्याचे जाहिर केले आहे. बॉयफ्रेंडसोबतचे कृष्णाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वादग्रस्त ठरले होते.शाहरूख खानची मुलगी सुहाना सध्या पार्ट्यांमध्ये बघावयास मिळत आहे. सुहाना दिसायला जरी साधी वाटत असली तरी, सोशल मीडियावर सध्या तिला सर्च केले जात आहे.सुष्मिता सेनची दत्तक घेतलेली मुलगी रेनी सुद्धा लवकरच बॉलीवुडमध्ये झळकण्याची शक्यता आहे. सुष्मिताने यापूर्वीच रिनीला रॅँप वॉक करण्याची संधी दिली होती. रिनी खुप स्टाइलिश आहे.शाहरूख खानचा मुलगा आर्यन देखील बॉलीवुडमधील एंट्रीसाठी सज्ज आहे. लवकरच तो चित्रपटात झळकेल अशी सध्या चर्चा आहे.