Join us

3825_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:40 IST

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरेबॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत.

हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर चेहरेबॉलीवूडमधील अभिनेत्री गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आजही अनेक सुंदर अभिनेत्रींची आठवण सिनेरसिक करीत असतात. या ‘बॉलीवूड दिवा’ अभिनेत्रींची माहिती देत आहोत.मधुबाला यांना आजही सिनेरसिक विसरलेले नाहीत. महल, मिस्टर अँड मिसेस ५५, हावडा ब्रिज, चलती का नाम गाडी आणि मुगल-ए-आजम या चित्रपटात त्यांच्या भूमिका अजरामर राहिल्या आहेत.नव्या पिढीच्या मधुबाला म्हणून माधुरी दीक्षित यांचे नाव घेतले जाते. साजन, हम आपके है कौन, दिल तो पागल है, देवदास या चित्रपटात त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांच्यावरही चित्रपट आला.‘बॉलीवूड दिवा’ म्हणून रेखा यांची आजही ओळख आहे. गेल्या अनेक वर्षापूर्वी त्या जशा दिसत होत्या, अगदी तशाच अजूनही दिसतात. बसेरा, उत्सव, घर, खूबसुरत, इजाजत आणि सिलसिला या चित्रपटात त्या खूप सुंदर दिसल्या होत्या.माजी मिस वर्ल्ड असणारी ऐश्वर्या ही सुंदर भारतीय चेहºयांपैकी एक. ताल, हम दिल दे चुके सनम, देवदास, धूम-२ या चित्रपटात तिने सिनेरसिकांचे लक्ष वेधून घेतले होते.बॉलीवूड अभिनेत्रींमधील सुंदर चेहरा. हिम्मतवाला, सद्मा, मिस्टर इंडिया, चालबाज आणि खुदा गवाह या चित्रपटांमधून श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखविली.ड्रीम गर्ल म्हणून आजही हेमा मालिनी यांची ओळख आहे. प्रसिद्ध नृत्यांगना आणि गुणी अभिनेत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अभिनेत्री, जॉनी मेरा नाम, सीता और गीता, जुगनू आणि धर्मात्मा या चित्रपटात त्यांनी काम केले आहे.माजी मिस वर्ल्ड आणि बॉलीवूडमधील सुंदर चेहरा. आपला ठसा उमटविण्यात ‘पीसी’ अग्रेसर राहिली आहे. अंदाज, ऐतराज, क्रीश, डॉन, फॅशन, दोस्ताना आणि अंजाना अंजानीमध्ये ती खूप सुंदर दिसली आहे.