Join us

30 Years Of SRK: सिनेइंडस्ट्रीत शाहरूख खानची ३० वर्षे, चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 17:14 IST

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला सिनेइंडस्ट्रीत ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक स्पेशल ट्विट केले आहे, जे खूप व्हायरल होत आहे.

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखला सिनेइंडस्ट्रीत नुकतेच ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. शाहरूख खानने २५ जून १९९२ रोजी ऋषी कपूर, दिव्या भारती यांच्यासोबत दीवाना चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या निमित्ताने शाहरूख खानने ट्विटरवर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. किंगा खानचे हे ट्विट भावूक करणारे आहे आणि हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यासोबतच 30 Golden Years of SRK ट्रेंड होताना दिसत आहे. तसेच शाहरूख खानचे फोटो आणि पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

शाहरुख खानने ट्विट केले की, ‘मला तुमचे प्रेम ३० वर्षांपासून मिळत आहे आणि आजही तुमचे हे प्रेम कायम आहे. माझ्या आयुष्याच्या अर्ध्याहून अधिक काळ मी तुमच्या सर्वांचे मनोरंजन केले आहे, हे आज लक्षात आले. मी वेळात वेळ काढून सर्वांचे आभार मानणार आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची खूप गरज आहे.'

शाहरूख खानचा सिनेइंडस्ट्रीत कोणीच गॉडफादर नव्हता. जेव्हा किंग खानने इंडस्ट्रीत पाउल टाकले त्यावेळी त्याच्याकडे कोणाचाच शिफारस नव्हता. त्याने स्वतःच्या हिमतीवर यश संपादन केले आहे. छोट्या पडद्यापासून कारकीर्दीची सुरूवात केली मग निगेटिव्ह भूमिका केल्या. त्याने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले.

शाहरुख खान शेवटचा २०१८ मध्ये 'झिरो' या चित्रपटात झळकला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ मुख्य भूमिकेत होत्या. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अयशस्वी ठरला. त्यानंतर शाहरुख खानने ब्रेक घेतला.

आता लवकरच तो 'पठाण' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटामध्ये शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत. 

टॅग्स :शाहरुख खान