Join us  

मेरे हिरो को काला-सफेद कौआ बना दिया...! ‘2.0’चे टीजर पाहून संतापले अक्षय कुमारचे चाहते!!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 8:20 PM

‘2.0’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वीच रिलीज झाला. पण हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.

‘2.0’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा टीजर काही तासांपूर्वीच रिलीज झाला. पण हा टीजर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. काहींना हा टीजर आवडला तर काहींना तो अपेक्षेइतका चांगला नसल्याची प्रतिक्रिया दिली. विशेषत: अक्षय कुमारच्या चाहत्यांनी हा टीजर पाहून सर्वाधिक नकारात्मक प्रतिक्रिया दिल्यात. संपूर्ण टीजरमध्ये अक्षय कुमारचा चेहरा फक्त एकदाच आणि तोही अगदी काही सेकंद दिसतो. यामुळे अक्षयच्या चाहत्यांमध्ये अनेक तक्रारीचे सूर उमटले.

 ‘एक तो मेरे अक्षय कुमार को काला-सफेद कौआ सा बना दिया, ऊपर से क्या ROFL ट्रेलर है,’ अशी प्रतिक्रिया अक्षयच्या एका चाहत्याने दिली. 

अनेक चाहत्यांनी टीजरमधील व्हीएफएक्स इफेक्ट अगदीच सुमार असल्याची प्रतिक्रिया नोंदवली तर अनेकांनी अक्षय कुमारला इतके कमी दाखवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

लवकरात लवकर चित्रपटाचा दुसरा टीजर रिलीज करा आणि त्यात अधिकाधिक अक्षयला दाखवा, अशी मागणीही अनेकांनी केली. तुम्ही अक्षयच्या चाहत्यांचे काही ट्विट खाली वाचू शकता.

 2.0’ हा चित्रपट दिग्दर्शक शंकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट पूर्ण व्हायला जवळजवळ २ वर्षे लागलीत. याचे कारण म्हणजे, शंकर या चित्रपटाबद्दल कुठलीही तडजोड करायला तयार नव्हते. प्रत्येक सीन माझ्या मनासारखा होत नाही, तोपर्यंत मी चित्रपट रिलीज होणार नाही, असे त्यांनी म्हणे, जाहीर करून टाकले होते. याचमुळे दोनदा या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली.  शंकर यांना निर्मात्यांची नाराजीही ओढवून घ्यावी लागली. 

 

टॅग्स :अक्षय कुमार2.0रजनीकांत