Join us  

Bappi Lahiri Death Reason: कशामुळे झालं बप्पी दा यांचं निधन? डॉक्टरांनी सांगितलं कारण; 1 महिन्यापासून होते रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 11:10 AM

बप्पी लाहिरी यांना मुंबईतील Criticare रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी दा यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वच जण शोक व्यक्त करत आहेत.

 नव्या वर्षाच्या सुरूवातीपासूनच दु:खद बातम्या कानावर यायला सुरुवात झाली आहे. नुकतेच स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले. लताजींनंतर प्रसिद्ध बंगाली गायिका संध्या मुखर्जी यांच्या निधनाची बातमी आली आणि आता बप्पी लाहिरीही यांनीही जगाचा निरोप घेतला. बप्पी लाहिरी यांना मुंबईतील Criticare रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बप्पी दा यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीपासून ते चाहत्यांपर्यंत सर्वच जण शोक व्यक्त करत आहेत.

बप्पी लाहिरी यांना नेमकी काय समस्या होती आणि त्यांचे निधन कशामुळे झाले, यासंदर्भात Criticare हॉस्पिटल के डायरेक्टर डॉ. दीपक नामजोशी यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, 'बप्पी लाहिरी हे गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल होते. सोमवारी (14 फेब्रुवारी) त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. बप्पी दा यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलावले. यानंतर बप्पी दा यांना तातडीने रुग्णालयात आणण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, बप्पी दा यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या होत्या. तसेच OSA (Obstructive Sleep Apnea) मुळे त्यांचे निधन झाले. 

OSA म्हणजे काय?OSA हा झोप पूर्ण न झाल्यामुळे होणारा एक आजार आहे. यात झोपेदरम्यान श्वास घेण्यास वेळो-वेळी अडथळा निर्माण होतो. यामुळे वजन तर वाढतेच, पण रक्तातील ऑक्सिजन लेवलही कमी होते.

80 आणि 90 च्या दशकात बप्पी लाहिरी यांचा प्रचंड दबदबा होता. बप्पी दा यांनी 'वरदात', 'डिस्को डान्सर', 'नमक हलाल', 'डान्स डान्स' आणि 'कमांडो' यांसह अनेक फिल्मी साउंडट्रॅक तयार केले. बप्पी दा यांनी राजकारणातही नशीब आजमावले होते. 2014 मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला. बप्पी दा यांना  श्रीरामपुर जागेवरून 2014 च्या निवडणुकीत मैदानात उतरवण्यात आले होते. मात्र, त्यांचा पराभव झाला होता.

 

टॅग्स :बप्पी लाहिरीमृत्यूमुंबईबॉलिवूड