Join us  

इन्स्टा रिल करण्याच्या नादात नर्गिसचा झाला अपघात; Video viral

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 6:17 PM

Nargis Fakhri:चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम रिल करणं नर्गिसला महागात पडलं आहे. व्हिडीओ शूटच्या नादात नर्गिसचा अपघात झाला आहे.

इम्तियाज अलीच्या (Imtiaz Ali) सुपरहिट ठरलेल्या 'रॉकस्टार' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे नर्गिस फाखरी (Nargis Fakhri). या चित्रपटात दमदार अभिनय करत नर्गिस रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. यात नर्गिसदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यात चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम रिल करणं नर्गिसला महागात पडलं आहे. व्हिडीओ शूटच्या नादात नर्गिसचा अपघात झाला आहे.

अलिकडेच नर्गिसने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सायकल चालवत असून दुसरीकडे या सायकलिंगचा व्हिडीओ काढत आहे. मात्र, कॅमेराकडे पाहाता पाहता तिचा बॅलेन्स चुकला आणि ती सायकलवरुन खाली पडली. सुदैवाने यात नर्गिसला कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, व्हिडीओ करणं तिला चांगलंच महागात पडल्याचं दिसून येतं.

दरम्यान, नर्गिस सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते. अभिनय व सौंदर्यामुळे कायम चर्चेत येणारी नर्गिस मध्यंतरी अभिनेता उदय चोप्रासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली होती. 

टॅग्स :नर्गिस फाकरीबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमा