Join us  

आधी सुपरस्टार अन् नंतर सुपरफ्लॉप, पण पत्नी आजही आहे लोकप्रिय अभिनेत्री, कोण हा अभिनेता..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2024 1:22 PM

असाच एक अभिनेता आहे, ज्यानं पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. पण नंतर त्याचे करिअर अचानक रुळावरून घसरले.

एका सिनेमाने स्टार झाले आणि नंतर एकामागे एक सिनेमे फ्लॉप होत गेले असे अनेक अभिनेते बॉलिवूडमध्ये आहेत. असाच एक अभिनेता आहे, ज्यानं पहिल्याच चित्रपटातून बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली. पण नंतर त्याचे करिअर अचानक रुळावरून घसरले. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नाही तर  'स्टुडंट ऑफ द इयर'  चित्रपटातील चॉकलेटी हिरो अर्थात सिद्धार्थ मल्होत्रा आहे. 

'स्टुडंट ऑफ द इयर'  या चित्रपटातून सिद्धार्थ मल्होत्रानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील त्याचा लूक आणि जबरदस्त अभिनयाने तो एका रात्रीत स्टार झाला. यानंतर त्याच्याकडे निर्मात्यांची रांग लागली. पण एकवेळ अशीही आली की, त्याच्या चित्रपटाकडे प्रेक्षक फिरकेनासे झाले.  2014 मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​मोठ्या पडद्यावर परिणीती चोप्रासोबत दिसला होता. दोन्ही स्टार्सने 'हंसी तो फंसी' या चित्रपटात काम केले होते. परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाई करु शकला नाही. मात्र, सिद्धार्थ मल्होत्राच्या अभिनयाचे कौतुक झाले.

 'एक व्हिलन' हा त्याचा सिनेमा सुपरहिट ठरला. श्रद्धा कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा या दोघांच्या जोडीने रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवले. यानंतर सिद्धार्थने अक्षय कुमारसोबत 'ब्रदर' चित्रपटात काम केलं. 2015 मध्ये रिलीज झालेला हा ॲक्शन चित्रपट होता. रिलीजनंतर 'भाई' बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही आणि फ्लॉप झाला. यानंतर आलिया भट्ट आणि फवाद खानसोबतचा ​'कपूर अँड सन्स' हा सिनेमाही कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. 2016 मध्ये रिलीज झालेला हा चित्रपट खूप चर्चेत होता आणित्यानंतर सिद्धार्थ मल्होत्राने एकही हिट चित्रपट दिलेला नाही.  सिद्धार्थनं फ्लॉप सिनेमे दिले असले तरी त्याची पत्नी कियारा आडवानीने मात्र अनेक हीट चित्रपट दिले आहेत.

'बार बार देखो', 'ए जेंटलमन', 'इत्तेफाक', 'अय्यारी', 'जबरिया जोडी', 'मरजावां' आणि 'थँक गॉड' यासह सिद्धार्थ मल्होत्राचे अनेक बॅक टू बॅक चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. फ्लॉप सिनेमानंतर त्याचा 'शेरशाह' हा ओटीटीवर प्रदर्शित झालेला सिनेमा प्रेक्षकांना आवडला. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​'इंडियन पोलिस फोर्स' या मालिकेमुळे चर्चेत आहे. याशिवाय तो लवकरच करण जोहरची निर्मिती असलेल्या 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. 

टॅग्स :सिद्धार्थ मल्होत्रासेलिब्रिटीबॉलिवूडकियारा अडवाणीसिनेमा