Join us

६ महिन्यांपर्यंत पतीला 'गे' समजत होती बॉलिवूड अभिनेत्री, म्हणाली- "मी त्याचा राग करायची..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:49 IST

एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला होता.

फराह खान (Farah Khan) ही बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि निर्माती-दिग्दर्शिका आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने अनेक उत्तम गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे. तिने शाहरुख खान स्टारर ब्लॉकबस्टर 'ओम शांती ओम' आणि 'मैं हूं ना' सारखे चित्रपट देखील केले आहेत. व्यावसायिक जीवनात खूप यशस्वी असलेल्या फराह खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर तिने दिग्दर्शक शिरीष कुंदर(Shirish Kunder)शी लग्न केले आहे. या जोडप्याच्या लग्नाला २० वर्षे झाली आहेत. फराह प्रसिद्धीझोतात राहते पण शिरीषला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते.

फराह खान दिग्दर्शित 'मैं हूँ ना' या चित्रपटादरम्यान ही जोडी पहिल्यांदा एकमेकांच्या जवळ आली होती. शिरीष या चित्रपटाचा एडिटर होता. तथापि, या जोडप्याचे नाते सकारात्मकतेने सुरू झाले नाही. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत फराहने खुलासा केला की ती पूर्वी शिरीषचा तिरस्कार करत होती.

फराह खान पती शिरीषला पूर्वी समजायची 'गे' खरेतर, अर्चना पूरण सिंगच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीदरम्यान फराहने शिरीषसोबतची तिची प्रेमकहाणी सांगितली होती. फराहने खुलासा केला, "लग्नाच्या सहा महिन्यांपर्यंत मला तो गे वाटला होता." शिरीषबद्दलच्या तिच्या भावना बदलल्या आहेत का, असे विचारल्यावर तिने विनोदी अंदाजात सांगितले की, "पूर्वी तो रागावायचा आणि जेव्हा तो रागवायचा तेव्हा ते खूप कठीण होते. कारण जो माणूस फक्त गप्प राहतो आणि मग तो न बोलून तुम्हाला टॉर्चर करत असतो."

दोघांच्या भांडणानंतर कोण म्हणतं सॉरी?जेव्हा अर्चनाने फराहला भांडणांनंतर कोण माफी मागते असे विचारले तेव्हा फराह म्हणाली, "कोणीही सॉरी म्हणत नाही" आणि पुढे म्हणाली, "शिरीषने २० वर्षांत माझी कधीच माफी मागितली नाही. कारण तो कधीच चुकीचा नसतो." फराहने असेही शेअर केले की, "जर तो बोलत असेल आणि त्यावेळी मी माझे फोनमध्ये लक्ष असेल तर तो बाहेर निघून जातो."

फराह-शिरीषच्या लग्नाला झालीत २० वर्षेफराह खान आणि शिरीष कुंदर यांच्या लग्नाला २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे आणि फराहच्या दिग्दर्शनातील पदार्पण 'मैं हूँ ना' दरम्यान दोघांची पहिली भेट झाली होती. त्या दोघांना दोन मुली, दिवा आणि अन्या आणि एक मुलगा जार आहे. 

टॅग्स :फराह खान