Join us
Daily Top 2Weekly Top 5

"प्रभू रामाने दर्शन द्यावे...", बॉलिवूड अभिनेत्रीने गायलं प्रथमेश लघाटेचं भक्तिगीत, व्हिडिओ पाहून गायकही भारावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2024 16:57 IST

प्रथमेशच्या एका भक्तीगीताची बॉलिवूड अभिनेत्रीला भुरळ पडली आहे. प्रथमेशचं भक्तीगीत अभिनेत्रीने गायलं आहे. या

'सारेगमप लिटिल चॅम्प्स'मधून प्रथमेश लघाटे घराघरात पोहोचला. प्रथमेश त्याच्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतो. आजवर त्याने अनेक अभंग, भक्तीगीते आणि गाण्यांना त्याचा आवाज दिला आहे. प्रथमेशचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. त्याच्या गाण्यांनी तो चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन करतो. पण, आता प्रथमेशच्या एका भक्तीगीताची बॉलिवूड अभिनेत्रीला भुरळ पडली आहे. प्रथमेशचं भक्तीगीत अभिनेत्रीने गायलं आहे. याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अदा शर्मा आहे. 

'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं मराठीप्रेम काही लपून राहिलेलं नाही. अदाला मराठी भाषेचं आकर्षण आहे. मराठी कवितांचे अनेक व्हिडिओ ती शेअरही करताना दिसते. आता अदाने चक्क भक्तीगीत गायलं आहे. प्रथमेश लघाटेचं 'अंतरी माझ्या श्रीराम' हे भक्तीगीत अदाने गायलं आहे. याचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओत अदा "प्रभू श्रारामाने दर्शन द्यावे...", हे भक्तीगीतातील बोल गाताना दिसत आहे.

तिचा हा व्हिडिओ पाहून प्रथमेश लघाटेही थक्क झाला आहे. त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवरुन अदाचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. याबरोबरच त्याने त्याच्या मूळ गाण्याची लिंकही दिली आहे. 

दरम्यान, २०२१मध्ये प्रथमेश लघाटेने गायलेलं हे भक्तीगीत प्रदर्शित करण्यात आलं होतं. या गाण्याला आवाज देण्याबरोबरच प्रथमेशने तबलावादन, तालवाद्य, व्हिडिओ एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी या बाजूही सांभाळल्या होत्या. प्रथमेश लघाटेचं हे भक्तीगीत प्रचंड लोकप्रिय आहे. 

टॅग्स :अदा शर्माटिव्ही कलाकारसेलिब्रिटी