Join us

बॉलिवूड अभिनेत्याने घरी आणल्या स्वामी समर्थांच्या पादुका, म्हणाला- "काल तिन्हीसांजेच्या वेळी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 17:17 IST

आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वामी समर्थांच्या पादुका घरी आणत त्याची पूजा केली. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

श्री स्वामी समर्थांचे अनेक सेलिब्रिटीही भक्त आहेत. कलाकारांनी त्यांनी अनुभवलेल्या स्वामी कृपेचे अनुभवही सांगितले आहेत. अनेक मराठी सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावाने स्वामींची पूजा करतात. तर आता एका बॉलिवूड अभिनेत्याने स्वामी समर्थांच्या पादुका घरी आणत त्याची पूजा केली. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

अभिनेता शाम मशाळकरने त्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुका आणल्या होत्या. त्याची भक्तीभावाने त्याने पूजा केली. याचे फोटो त्याने शेअर केले आहेत. "आमच्या घरी काल तिन्हीसांजेच्या वेळी *श्री स्वामी समर्थ चिन्मय पादुका गुरुमंदिर ( श्री बाळप्पा मठ ) अक्कलकोट* यांचे पुजन झाल्याने प्रसन्न वाटले. स्वामींची कृपा", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे. या पूजेत त्यांच्या कुटुंबीयांनी भाग घेतला होता. शामच्या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, शाम सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याने 'अजब प्रेम की गजब कहानी', 'जब वी मेट', 'बचना ए हसीनो', 'हाऊसफूल ४', 'पानीपत', 'किडनॅप' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शाम काही टीव्ही मालिकांमध्येही दिसला होता. 

टॅग्स :श्री स्वामी समर्थसेलिब्रिटी