Join us  

राणी मुखर्जीसोबत लीड रोल तर सलमानसाठी ठरला लकी चॅम्प; यशाच्या शिखरावर असताना अभिनेत्याने अचानक घेतला जगाचा निरोप 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 5:38 PM

वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारत फराज खानने त्याचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला होता.

Faraaz Khan : देखणा चेहरा, दमदार अभिनय  त्याचबरोबर डौलदार शरीरयष्टी असणारा हा अभिनेता. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये धाटणीच्या भूमिका साकारत त्याने त्याचा वेगळा असा चाहतावर्ग निर्माण केला होता. नेमका कोण आहे हा अभिनेता, जाणून घ्या. 

फक्त ७ सिनेमांमध्ये काम करत त्याने चाहत्यांची मनं जिंकली. या अभिनेत्याचं नाव आहे फराज खान . फराजची फिल्मी कारकीर्द काही खास नव्हती. फराज खान हा बॉलिवूड कॅरेक्टर आर्टिस्ट युसूफ खान यांचा मुलगा आहे. बॉलिवूडमधील अमिताभ बच्चन, धर्मेंद्र यांसारख्या बड्या कलाकरांसोबत सिनेमांत काम करत युसूफ खान यांनी हिंदी सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत फराजने इंडस्ट्रीत पदार्पण केलं. 

राणी मुखर्जीच्या 'मेहंदी' या सिनेमात मुख्य भूमिका साकारत अभिनेता फराज खान प्रकाशझोतात आला. याशिवाय फरेब, पृथ्वी, दुल्हन बनु मैं तेरी. दिल ने फिर याद किया, चॉंद बुझ गया यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील त्यानं काम केलं. 

एका सिनेमाने सलमानचं नशीब फळफळलं- 

९० च्या दशकातील गाजलेल्या 'मैंने प्यार किया' सलमान खान तसेच भाग्यश्री पटवर्धन  स्टारर सिनेमा प्रंचड गाजला. पडद्यावर दिवसेंदिवस कमाईचे नवे विक्रम रचणाऱ्या या चित्रपटाची क्रेझ आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. 

या सिनेमाने भाईजानला नवी ओळख मिळवून दिली. 'मैंने प्यार किया' या चित्रपटाने त्याला रातोरात स्टार बनवले. हा सिनेमा दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी फराज खानला ऑफर केला होता. फराज खान या सिनेमासाठी पहिली पसंत होता.  सुरज बडजात्या या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्यांच्या शोधात होते. ऑडिशन घेतल्यानंतर फराजची निवड या सिनेमासाठी झाली. चित्रपटासाठी फराज खानला साईनदेखील करण्यात आलं होतं. चित्रपटाच्या चित्रीकरणाची तारीख ठरली आणि पण ऐन वेळी फराज खान आजारी पडला. शूटिंग करणं त्याला शक्य नसल्याने त्याने या चित्रपटात काम केलं नाही. 

बरेच दिवस उलटुनही फराज खान यांच्या तब्बतीत सुधारणा होत नव्हती. अखेर सुरज बडजात्यांनी दुसरा पर्याय शोधला आणि या चित्रपटासाठी सलमानची निवड केली. 

टॅग्स :बॉलिवूडराणी मुखर्जीसलमान खान